Home महाराष्ट्र सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’

सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’

1

मी माझ्या आईकडून आता ‘रयत क्रांती संघटने’चा बिल्ला लावून घेतला आहे. आता माझा बिल्ला काढायला कुणी येणार नाही. बिल्ला काढायची ताकद कुणाच्या हातात नाही, अशा शब्दांत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आपल्या नव्या संघटनेची स्थापना केली.

कोल्हापूर- मी माझ्या आईकडून आता ‘रयत क्रांती संघटने’चा बिल्ला लावून घेतला आहे. आता माझा बिल्ला काढायला कुणी येणार नाही. बिल्ला काढायची ताकद कुणाच्या हातात नाही, अशा शब्दांत राजू शेट्टी यांना आव्हान देत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आपल्या नव्या संघटनेची स्थापना केली. प्रत्येक तालुक्यातून किमान पाच हजार सदस्य बनविणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी आज कोल्हापुरात नवी संघटना स्थापन केली. रयत क्रांती संघटना असे त्यांच्या नव्या संघटनेचे नाव आहे. नव्या संघटनेची स्थापना करताना त्यांनी राजू शेट्टींवर जोरदार निशाणा साधला. मला नेता म्हणून नाही, तर कार्यकर्ता म्हणून जगायचे आहे. आता नांगरणी मीच करणार, पेरणी मीच करणार, खळ्याची मालक मात्र रयतच राहील, अशी नवी घोषणाही सदाभाऊंनी यावेळी केली.

राज्यातल्या ३५३ तालुक्यात प्रत्येकी पाच हजार कार्यकर्ते याप्रमाणे पुढच्या सहा महिन्यांत संघटनेची सभासद संख्या १७ लाखांवर नेऊ, असा दावाही सदाभाऊ खोत यांनी यावेळी केला आहे.

सरकार उसाला चांगला एफआरपी देणार असल्याने यंदा ऊस दराचे आंदोलन करण्याची गरज नसल्याचेही सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. मला कुठले दुकान चालवायचे नाही, शेतक-याला चालवायचे आहे, पण काही लोकांना माझे मंत्रीपद बघवले नाही, म्हणूनच मला स्वाभिमानीतून बाहेर पडावे लागल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले. मी माझ्या आईकडून बिल्ला लावून घेतला आहे. आता माझा बिल्ला काढायला कुणी येणार नाही. बिल्ला काढायची ताकद कुणाच्या हातात नाही. माझाच काय कार्यकर्त्यांचाही बिल्ला काढला जाणार नाही, आपण दुस-याला नावे ठेवण्यापेक्षा कामातून मोठे होऊया, असेही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले.

सदाभाऊ खोत यांनी स्थापन केलेल्या रयत क्रांती संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी टेक्सटाईल पार्कचे अध्यक्ष सुरेश पाटील यांची नेमणूक केली आहे. तर युवक आघाडीच्या अध्यक्षपदी शार्दुल जाधव यांची नेमणूक केली आहे. ‘संवादातून संघार्षाकडे’ असे खोत यांच्या संघटनेचे घोषण वाक्य आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात पाच हजार या प्रमाणे दोन महिन्यांत १७ लाख सदस्य करण्याचा संकल्प खोत यांनी केला आहे.

1 COMMENT

  1. बर झाल तुम्ही कोणत्याच पक्षात नाही गेलात ते नाहीतर आमचा कोणाचाही तुमच्यावर विश्वास राहिला नसतां
    आता आम्ही तुमच्या मागे उभे आहोत आता आपली ताकद दाखवूनच देऊ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version