Home मनोरंजन सैफ-करीनाच्या घरी चिमुकल्याचे आगमन

सैफ-करीनाच्या घरी चिमुकल्याचे आगमन

1

बॉलिवूडची बेबो करिना कपूर आणि नवाब सैफ अली खान यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. 

मुंबई- बॉलिवूडची बेबो करिना कपूर आणि नवाब सैफ अली खान यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्यांना मंगळवारी सकाळी ब्रीच कॅन्डी रुग्णालयात पुत्ररत्नाचा लाभ  झाला आहे. बाळ आणि करिना दोघेही सुखरूप असल्याची माहिती मिळते.

बाळाचे नाव तैमूर अली खान पतौडी असे ठेवण्यात आले आहे. सैफ अली खानने आपण बाबा झाल्याचे सांगितले असून सर्व चाहत्याचे आभार मानले आहेत. या नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे कपूर आणि पतौडी कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, बॉलीवूड निर्माता दिग्दर्शक करण जोहर याने ट्विटरवरून करिनाला बाळ झाल्याची बातमी दिली. ‘माझ्या बेबोला मुलगा झाला आहे मी खूप खूप खुश आहे’, असे ट्विट करत करण जोहरने आपला आनंद व्यक्त केला आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version