Home क्रीडा निवृत्ती घेतली नसती तर सचिनला संघाबाहेर बसवणार होतो

निवृत्ती घेतली नसती तर सचिनला संघाबाहेर बसवणार होतो

1

निवृत्ती घेतली नसती तर विक्रमवीर सचिन तेंडुलकरला संघाबाहेर बसवणार होतो, असा गौप्यस्फोट माजी निवडसमिती संदीप पाटील यांनी केला.

मुंबई- निवृत्ती घेतली नसती तर विक्रमवीर सचिन तेंडुलकरला संघाबाहेर बसवणार होतो, असा गौप्यस्फोट माजी निवडसमिती (मुख्य सिलेक्टर) संदीप पाटील यांनी बुधवारी एका मराठी चॅनेलवरील वार्तालापामध्ये केला.

‘‘१२ डिसेंबरला आम्ही सचिनची भेट घेऊन त्याच्या पुढील वाटचालीबाबत विचारले. त्यावेळी ‘सध्या तरी निवृत्त होण्याचा विचार नसल्याचे,’ सचिनने सांगितले. मात्र सचिनचा त्यावेळचा फॉर्म तसेच नव्या क्रिकेटपटूंना संधी देण्यादृष्टीने विचार करताना सचिनला वगळण्याबाबत निवडसमितीमध्ये एकमत झाले होते.

शिवाय बोर्डालाही आम्ही तसे कळवले होते. सचिनला आमचा गर्भित इशारा समजला. त्याने पुढच्याच बैठकीत निवृत्त होत असल्याचे बोर्डाला कळवले,’’ असे संदीप पाटील म्हणाले.

‘धोनीला कसोटी कर्णधारपदावरून दूर करण्याबाबतही चर्चा झाली’ कसोटी क्रिकेटमध्ये नवा कर्णधार म्हणून विराट कोहलीला पसंती मिळत असल्याने महेंद्रसिंग धोनीला कर्णधारपदावरून दूर करण्याबाबत निवडसमितीमध्ये चर्चा झाली. मात्र ऑस्ट्रेलिया दौ-यात धोनीने निवृत्ती जाहीर करत आम्हाला आश्चर्याचा धक्का दिला, असे संदीप पाटील म्हणाले.

1 COMMENT

  1. संदीप पाटील आता ह्या गोष्टी सांगण्याची काहीही गरज नाही. निदान सचिनच्या बाबतीत तरी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version