Home Uncategorized स्वीस बँकेत भारतीयांचे ८३९२ कोटी रुपये

स्वीस बँकेत भारतीयांचे ८३९२ कोटी रुपये

1
संग्रहीत छायाचित्र

आता स्वीस बॅँकेत भारतीयांचे केवळ ८३९२ कोटी रुपयेच आहे, असा खुलासा स्वीस नॅशनल बॅँकेने केला आहे.

संग्रहीत छायाचित्र

झुरिक- भारतीयांचा प्रचंड काळा पैसा स्वीस बँकेत दडवल्याचा आरोप होत असतो. स्वीस बॅँकेतील भारतीयांची खात्याची माहिती देण्याचा आग्रह भारत सरकारकडून होतो. पण, स्वीस बॅँकेतील भारतीयांचा पैसा सातत्याने कमी होत असल्याचे आढळले आहे. आता स्वीस बॅँकेत भारतीयांचे केवळ ८३९२ कोटी रुपयेच आहे, असा खुलासा स्वीस नॅशनल बॅँकेने केला आहे.

स्वीस नॅशनल बॅँक ही स्वित्झर्लंडमधील बॅँकिंग व्यवसायावर नियंत्रण ठेवणारी संस्था आहे. या संस्थेने भारतीयांच्या पैशाबाबतचा अहवाल गुरुवारी जाहीर केला. भारतीयांचा स्वीस बॅँकांतील पैसा १२१७.६ दशलक्ष स्वीस डॉलर्सवरून ५९६.४२ दशलक्ष स्वीस डॉलर्सपर्यंत (८३९२ कोटी) घसरला आहे. सलग दुस-या वर्षी भारतीयांची स्वीस बॅँकेतील संपत्ती घसरलेली दिसत आहे.

२००६ मध्ये भारतीयांचे स्वीस बॅँकेत २३ हजार कोटी रुपये होते. त्यानंतर भारतीयांच्या स्वीस बॅँकेतील पैसा कमी होऊ लागला. २०१५च्या अखेरीस भारतीयांचे स्वीस बॅँकेत केवळ १२०६.७१ दशलक्ष स्वीस डॉलर्स राहिले, असे बॅँकेच्या अहवालात म्हटले आहे.

सध्या स्वित्झर्लंडने जगातील अनेक देशांशी करार केले आहेत. त्यामुळे परदेशी नागरिकांच्या बॅँक खात्यांची माहिती स्वीस सरकारला देणे बंधनकारक बनले आहे. विशेष म्हणजे भारत व स्वित्झर्लंडमध्येही याबाबतचा करार झाला आहे. भारताने काळा पैशाच्या विरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. २०१८ नंतर भारत व स्वित्झर्लंडलडमध्ये काळा पैशाची माहिती देणारी यंत्रणा स्वयंचलित पद्धतीने कार्यरत होणार आहे. स्वीस बॅँकेतील काळा पैशाची माहिती देण्यात यावी, अशी विनंती भारताने स्वीस सरकारला केली आहे. त्यासाठी लवकरच भारतीय अधिकारी स्वित्झर्लंडला जाणार आहेत.

1 COMMENT

  1. मुंबईतील ऊंच टॉवर स्वीस बॅँकेतील काळा पैसा वापरून उभे राहत आहेत.चांगली गोष्ट आहे.काळा पैसा कसा तयार होतो.कोणीच सांगत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version