Home मध्यंतर श्रध्दा-संस्कृती तेहतीस कोटी देव कोणते?

तेहतीस कोटी देव कोणते?

2

बहुतेक लोकांना ‘तेहतीस कोटी’चा अर्थ ‘तेहतीस करोड’ असाच वाटत असतो. पण मुळात संस्कृतात ‘कोटी’ या शब्दाचा अर्थ करोड नसून ‘प्रकार’ असा आहे. 

उत्तर- बहुतेक लोकांना ‘तेहतीस कोटी’चा अर्थ ‘तेहतीस करोड’ असाच वाटत असतो. पण मुळात संस्कृतात ‘कोटी’ या शब्दाचा अर्थ करोड नसून ‘प्रकार’ असा आहे. कल्पना अशी आहे की, ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी ३३ देवांना कार्यभार सोपवले आहेत.
त्यांच्यात ८ वसू, ११ रूद्र, १२ आदित्य, १ इंद्र आणि १ प्रजापती असे पाच स्तर आहेत. प्रत्येकाचे कार्य (खाते) भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगळी कोटी (कॅटेगरी) दिलेली आहे.

अष्टवसूंची नावे : आप, धृव, सोम, धर, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास.

अकरा रूद्रांची नावे : मनू, मन्यू, महत, शिव, ष्टद्धr(7०)तुध्वज, महिनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृत-ध्वज.

बारा आदित्यांची नावे : अंशुमान, अर्यमन, इंद्र, त्वष्टा, धानू, पर्जन्य, पूषन, भग, मित्र, वरूण, वैवस्वत व विष्णू.

असे एकंदर ८+११+१२+१+१ = ३३

2 COMMENTS

  1. बारा आदित्यांमध्ये इंद्र परत दाखवला आहे. त्याऎवजी कोणी दुसरा आहे का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version