Home टॉप स्टोरी आम्ही बोलत नाही.. करून दाखवतो!!

आम्ही बोलत नाही.. करून दाखवतो!!

1
tejas aircraft

सैन्य दले बोलत नाहीत, तर करून दाखवतात. कोणत्याही आव्हानाला तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यास लष्कर तयार आहे, असे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अरुप राहा यांनी ठामपणे सांगितले.

हिंडन हवाई तळ- सैन्य दले बोलत नाहीत, तर करून दाखवतात. कोणत्याही आव्हानाला तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यास लष्कर तयार आहे, असे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अरुप राहा यांनी शनिवारी ठामपणे सांगितले. सर्जिकल हल्ल्यांवरून सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेबद्दल ते म्हणाले की, यासंदर्भात देशात कितीतरी चर्चा सुरू आहे, समाजातील प्रत्येक घटक आपले मत मांडतो आहे. मात्र देशाला अपेक्षित ती कामगिरी लष्करी दळांनी करावी अशी अपेक्षा असते. त्याबद्दल आम्ही बोलणार नाही, वेळ आली की करून दाखवू.

राहा चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्षही आहेत. भारतीय हवाई दलाच्या ८४ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी हवाई दलाच्या विमानांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवून आपल्या शक्तीचे प्रदर्शन घडवले. या प्रात्यक्षिकांत भारतीय बनावटीच्या ‘तेजस’ या लढाऊ विमानाने आपल्या सामर्थ्यांची चुणूक दाखवून दिली. ते म्हणाले की, आम्ही कोणत्याही हल्ल्याचा मुकाबला करण्यास सज्ज आहोत.

कोणत्याही आगळिकीला तोडीस तोड उत्तर दिले जाईल. दहशतवादी कितीही आक्रमक झाले तरी लष्कर त्यांचा खात्मा करणारच हे नक्की. प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर सैन्यदल अधिक स्मार्ट होत असून नवनवीन पद्धती शिकत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version