Home महामुंबई कामगारांनो हक्काचे घर विकू नका!

कामगारांनो हक्काचे घर विकू नका!

1

ज्या शहराच्या जडणघडणीत कामगारांचा मोलाचा वाटा आहे, ज्या शहरात कामगारांनी घाम गाळला त्याच शहरात कामगारांना हक्काचे घर मिळाले आहे. 

मुंबई- ज्या शहराच्या जडणघडणीत कामगारांचा मोलाचा वाटा आहे, ज्या शहरात कामगारांनी घाम गाळला त्याच शहरात कामगारांना हक्काचे घर मिळाले आहे. पण परिस्थिती अभावी, आर्थिक टंचाईमुळे काही कामगारांनी त्यांची घरे विकून गावची वाट धरली आहे.

मुंबईसारख्या विस्तारणा-या शहरात आपल्या हक्काचे घर असणे ही मोठी गोष्ट आहे. तुमच्या पुढच्या पिढीला या मुंबई नगरीत परवडणा-या दरात घर घेणे शक्य होईल की नाही हे लक्षात घेता कोणत्याही कामगाराने त्यांचे घर विकू नये, असे भावनिक आवाहन माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी कामगारांना केले.

‘मुंबई गिरणी कामगार गृहनिर्माण सहकारी फेडरेशन’तर्फे गुरुवारी दामोदर हॉल येथे आयोजित कामगार मेळाव्यात ते बोलत होते. २८ जून २०१२साली म्हाडाद्वारे गिरणी कामगारांच्या घरांसाठी पहिली सोडत काढण्यात आली. या घटनेला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यात सचिन अहिर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासह गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर, प्रवीण येरूणकर, बाबा कदम, राकेश तिवरेकर, नीलेश राऊत यांच्यासह कामगार मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी शाल-श्रीफळ देऊन सचिन अहिर यांचा सन्मान करण्यात आला.

लॉटरीद्वारे कामगारांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होत आहे. घरात काही प्राथमिक सुविधांचा अभाव जाणवल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी कामगारांनी फेडरेशनची स्थापना केली. हा प्रश्न लवकरात लवकर निकाली लावण्यासाठी कामागार आमच्याकडे येत असतात. या मुद्यांना राजकीय स्वरूप येऊ नये व कामगारांनी स्वत: पुढाकार घेण्यासाठी आम्ही कामगारांना प्रोत्साहन देत असतो, असे अहिर म्हणाले.

गिरणीच्या जागेवर घर देण्याच्या लढयात यश मिळवणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य आहे. येणा-या काळात कामगारांनी असाच इतिहास रचला पाहिजे. यासाठी सर्वानी संघटित होणे गरजेचे आहे. त्यामुळेच सर्व समस्या सोडवता येतील, असे कामगार नेते दत्ता इस्वलकर म्हणाले.

1 COMMENT

  1. सरळ सरळ कामगारांना फसवलय त्यानांचयाकडे पैसे नसतील तर ते काय करतील शेवटी तेच होतोय प्रतयेक जणांकडे एवढे तर पैसे नाही आहे ते हक्काचा घर आहे तर त्यांना मोफत घर द्यावी आताच सरकार काय करतोय ते पाहू त्यांना जर जाणीव असेल तर ते गिरणी कामगारांना मोफत घर देतील आणि आश्वासन देणं सोडून द्यावी सरकारने त्यामुळे काही कामगारांचा जीव आहे त्यात पण कोणीच लक्ष देत नाही मोदी सरकार काय करत अवघे ते कळत नाही माझी इच्चा हीच आहे कि त्यांना त्यानच्या मेहनतीचा फळ द्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version