दोनदा वाजलाघरातला फोनसारेच कामातघेईल कोण?मीच उचललाचटकन फोन म्हटलं, कोण?बोला पटकनबाबा आत्तानाही घरातआई आहेखूपच कामातदादा करतोयअभ्यास कधीचाताईने ओरडाखाल्लाय आईचामलाही आहेकामच कामकामाने दमूनगेलोय जामझालं का बोलूनठेवू का फोन?पण नाव नाही सांगितलंबोलतंय कोण?
काव्यकोडी
१) धान्याच्या कापणीसाठी
वापरले जाते
बागकाम करण्यासाठी
उपयोगात येते
लाकडी मूठ आणि
तोंड वळलेले असते
ओळखले का लोखंडी हे
साधन कोणते?
२) मेणापासून मुख्य
तिची निर्मिती होते
घरगुती उद्योगातही
ती तयार केली जाते
दंडगोलाकार आकार
वर छोटीशी वात
अंधारावर कोण बरं
करते मात ?
३) सतार, तंबोऱ्यासाठी
याचा होतो वापर
म्हातारी यात बसून
गेली दूरवर
वेलीवर येते
आकाराने मोठी
सांगा बरं ही
फळभाजी कोणती?
उत्तर -
भोपळा
मेणबत्ती
विळा
चित्र रंगवा, बक्षीस जिंकाचित्र रंगवा, बक्षीस जिंकाkilbil@prahaar.co.in
चित्र रंगवा आणि बक्षीस मिळवा.
चित्र रंगवून कात्रण ई-मेल
करा अथवा टपालाद्वारे गुरुवारपर्यंत पाठवणे.
स्पर्धकाचे नाव, फोटो शाळेचे नाव व ठिकाण, इयत्ता, घरचा पत्ता आणि संपर्क क्रमांक.
सर्वोकृष्ट चित्र रंगवणाऱ्या विजेत्याला बक्षीस आणि प्रसिद्धी दिली जाईल.
प्रहारचे कर्मचारी आणि त्यांच्या परिवारास स्पर्धेत भाग घेता
येणार नाही.