आज मिती वैशाख शुद्ध द्वितीया १०.५२ पर्यंत नंतर तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र भरणी ७.१० नंतर कृतिका. योग आयुष्यमान. चंद्र राशी मेष. भारतीय सौर २९ चैत्र शके १९४८. रविवार, दिनांक १९ एप्रिल २०२६. सूर्योदय ६.१८, चंद्रोदय ७.२६, सूर्यास्त ६.५६, चंद्रास्त ९.०८ , राहू काळ ५.२२ ते ६.५६. अक्षय तृतीया, श्री बसवेश्वर जयंती, श्री परशुराम जयंती, शुभ दिवस.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
मेष : हातात घेतलेल्या प्रत्येक कार्यात यश मिळेल. दिवस अनुकूल आहे
वृषभ : इच्छापूर्तीचा दिवस. महत्त्वाचे काम होईल. आनंद आणि उत्साह वाढेल
मिथुन : कलाकार व साहित्य क्षेत्रातल्या जातकांना मोठी प्रसिद्धी व यश मिळेल
कर्क : आपल्या समोरील कामे करण्यासाठी आपल्याला कार्यमग्न राहावे लागेल
सिंह : तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील. प्रवास सावधानतेने करा
कन्या : आपल्या आरोग्याकडे लक्ष ठेवणे हितकारक ठरेल
तूळ : स्वतः केलेली मध्यस्थी यशस्वी होऊन लाभ होण्याची शक्यता
वृश्चिक : व्यावसायिक उत्सव प्रदर्शनातून मोठे लाभ
धनु : महत्त्वाची कामे हातावेगळी करू शकाल
मकर : वास्तुविषयक व्यवहार होतील
कुंभ : विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरू शकतात
मीन : आजचा दिवस अनुकूल ठरेल. केलेल्या कष्टाचे फळ मिळू शकते