- दिल्लीत दाखल; शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या महत्त्वपूर्ण सुनावणी
मुंबई : उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे ही बैठक सुरू असतानाच शिंदे हे तातडीने राजधानी दिल्लीसाठी रवाना झाले. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत बुधवारी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. (Eknath Shinde)
मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार संग्राम जगताप आणि महेश लांडगे हे तिघेही हिंदू नायक असून हिंदुत्त्वासाठी काम करत आहेत आणि त्यांनी ...
एकनाथ शिंदे हे सोमवारी भीमाशंकर दौऱ्यावर असल्यामुळे मुंबईत परतण्यास उशीर झाल्याने ते कॅबिनेट बैठकीला पोहचू शकले नाहीत, अशी चर्चा असली तरी त्यांच्या या गैरहजेरीला राजकीय संदर्भ जोडले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयात बुधवारी शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी पार पडणार आहे. या प्रकरणी उबाठा गटातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. कपिल सिब्बल आणि अॅड. देवदत्त कामत यांनी युक्तिवाद पूर्ण केला असून, आता शिवसेनेचे वकील युक्तिवाद करणार आहेत. न्यायालयातील या सुनावणीच्या पूर्वसंध्येला एकनाथ शिंदे दिल्लीत पोहोचल्यामुळे ते विधितज्ज्ञांसोबतच केंद्र सरकारमधील वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Eknath Shinde)
मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या एक सदस्यीय आयोगाचा अहवाल राज्य ...
मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय झाले?
- २०२९ पर्यंत महाराष्ट्रातून अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्वसमावेशक शासकीय दृष्टिकोन धोरण जाहीर - शासकीय-निमशासकीय बैठका, कार्यक्रमांच्या दरम्यान तसेच उपहारगृहात आरोग्यदायी अन्नपदार्थ ठेवण्याच्या धोरणाला मान्यता. संतुलित मेन्यू ठेवणे बंधकारक - सोलापूर शहरातील जुना पुणे नाका ते बोरामणी नाका दरम्यान उन्नत मार्ग प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प म्हणून घोषित. यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ वरील हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक शासकीय जमीन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणास हस्तांतरित होण्याचा मार्ग मोकळा. - कुकडी पाटबंधारे प्रकल्प, जिल्हा पुणेला ५ हजार ७०४ कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मान्यता. १ लाख ४४ हजार ९१२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार






