Wednesday, September 23, 2026

Diabetes Free Mumbai : भाजपच्या ‘मधुमेहमुक्त मुंबई' अभियानाचा विक्रम

Diabetes Free Mumbai : भाजपच्या ‘मधुमेहमुक्त मुंबई' अभियानाचा विक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन; एकाच दिवशी २८७ आरोग्य शिबिरांमध्ये ७९ हजार ३०६ नागरिकांचा सहभाग

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच त्यांनी घटनात्मक पदावर २५ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने मुंबई भाजपने मंगळवारी शहरातील २८७ ठिकाणी रक्तातील साखरेची तपासणी, रक्त तपासणी आणि रक्तदाब तपासणीसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन केले. या शिबिरांमध्ये एकूण ७९ हजार ३०६ नागरिकांनी सहभाग घेतला असून, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने त्याची नोंद घेतल्याची माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम यांनी बुधवारी दिली. ( Diabetes Free Mumbai )

या उपक्रमात सहभागी झालेले डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिकांचे साटम यांनी आभार मानले. मुंबईकरांमध्ये मधुमेहाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला प्रोत्साहन देणे हा या अभियानाचा उद्देश होता. ‘मधुमेहमुक्त मुंबई’ अभियानासोबतच मुंबईभर नागरिककेंद्रित अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून जनसेवेचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच पक्षाच्या ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेला बळ देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे साटम यांनी सांगितले. ( PM Narendra Modi Birthday)

‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत भाजपकडून समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी सेवाभिमुख उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. या अभियानाची मार्गदर्शक संकल्पना ‘जनसेवा हीच प्रभुसेवा’ असून विविध १२ कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. महिनाभर हा उपक्रम चालणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा