देशाच्या डिजिटल विकासात महत्त्वपूर्ण सहभाग
पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीचा आणि दूरसंचार मंत्रालयाच्या दूरसंचार विभागांतर्गत येणारा हा केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम मोबाईल, भारत फायबर एफटीटीएच ब्रॉडबँड, फिक्स्ड-लाइन आणि विविध एंटरप्राइझ सेवा पुरवतो. ही संस्था देशातील ग्रामीण, दुर्गम आणि धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये दूरसंचार पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यात नेहमीच आघाडीवर राहिली आहे. तसेच 'भारतनेट' (BharatNet) सारख्या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय उपक्रमांच्या अंमलबजावणीमध्येही बीएसएनएलची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.
विदर्भातील दूरसंचार जाळ्याचा विस्तार
विदर्भ क्षेत्रात, बीएसएनएल नागपूर व्यवसाय क्षेत्राने आपल्या दूरसंचार पायाभूत सुविधांचा विस्तार आणि आधुनिकीकरणावर विशेष भर दिला आहे. याद्वारे व्यापक प्रमाणावर ऑप्टिकल फायबरचे जाळे उभारण्यात आले असून 'भारत फायबर' सेवांचा प्रभावी विस्तार करण्यात आला आहे. हे भक्कम नेटवर्क बुटीबोरी आणि हिंगणा यांसारख्या प्रमुख औद्योगिक क्षेत्रांसह नागपूर आणि लगतच्या परिसरातील नागरिकांना, तसेच विविध सरकारी कार्यालये, शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि व्यावसायिक आस्थापनांना दर्जेदार सेवा पुरवत आहे.(BSNL 27th Foundation Day)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून महत्त्वपूर्ण चर्चा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर संवाद साधला आहे. या ...
भविष्यातील वाटचाल आणि 4G सेवांचा विस्तार
स्थापना दिनानिमित्त बीएसएनएल नागपूर व्यवसाय क्षेत्राच्या प्रधान महाव्यवस्थापक नम्रता तिवारी यांनी संस्थेचे सर्व कर्मचारी आणि भागधारकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले की, सध्या देशभरात सुरू असलेली 4G सेवांची जलद अंमलबजावणी आणि व्यापक नेटवर्क विस्तार हा वापरकर्त्यांच्या बदलत्या संपर्कविषयक आणि डिजिटल गरजा पूर्ण करण्याच्या संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग आहे. ग्राहकांना अधिक वेगवान आणि विश्वासार्ह सेवा देण्याच बद्धपरिकर राहून बीएसएनएल आगामी काळातही आपले सेवा जाळे अधिक बळकट करणार आहे.