
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विद्याविहार रेल्वे स्थानकावरील एल.बी.एस. मार्ग व आर.सी. मार्ग यांना जोडणाऱ्या उड्डाण पुलाच्या बांधकामाचा खर्च तब्बल १० कोटी रुपयांनी वाढला गेला आहे. या पुलाच्या पोहच रस्त्यांचे बांधकाम करण्यासाठी हा खर्च वाढला गेला असून इमारती वाचवण्यासाठी रस्ता रेषा वळण्याकरता मूळ आराखड्यात बदल करण्यात आल्याने हा खर्च वाढवल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मुंबई महापालिकेच्यावतीने विद्याविहार रेल्वेस्थानकावर एल.बी.एस. मार्ग व आर.सी. मार्ग यांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या पोहचरस्त्यांचे बांधकाम करण्यासाठी डिसेंबर २०२३ रोजी ए. बी. इन्फ्राबिल्ड लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली होती. या कामाला प्रत्यक्षात फेब्रुवारी २०२४ रोजी सुरुवात झाली. या कामांसाठी ७६.१८ कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. आता याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पूर्व उपनगरातील घाटकोपर (पूर्व) मधील गारोडिया नगर वसाहतील खासगी रस्त्यांचा विकास पाच वर्षांपूर्वी करण्यात आल्यानंतर आता याच ...
या उड्डाणपुलाच्या कामाच्या पश्चिम बाजूस ३६.५० मी रुंदीची रस्ता रेषा असून रेषा बांधकामामुळे बाधित आहे. या रस्ता रेषा पूर्णपणे मोकळी करण्यासाठी चार इमारती हटवून जवळपास ५३ सदनिका धारकांना इतरत्र विस्थापित करावे लागले असते. मात्र बाबत खासदार संजय दिना पाटील यांनी पत्राद्वारे या इमारती वाचवण्यासाठी रस्ता रेषा वळविण्याची विनंती केली. त्यानुसार, पूलाच्या मूळ आरखड्यात आवश्यक ते बदल करून रस्ता रेषा वळविण्यात आली व त्या करिता सक्षम अधिकाऱ्यांची आवश्यक ती प्रशासकीय मंजूरी प्राप्त करण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
विद्याविहार रेल्वे स्थानकावर एल.बी.एस. मार्ग व आर.सी. मार्ग यांना जोडणाऱ्या उड्डाण पुलाच्या पोहच रस्त्यांचे बांधकाम करणेबाबतच्या कामाचा एकूण विविध करांसह अंदाजित खर्च ९५.५५ कोटी रुपयांचा होता. त्यात आता हा आराखडा बदल्याने १०.६२ कोटी रुपयांची वाढ होवून एकूण खर्च १०६.१८ कोटी रुपये एवढा झाला आहे. दरम्यान हे पुल आता लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असून येथील नॉईज बॅरिकेट्स लावण्याचे काम शिल्लक आहे. त्यानंतर हे पूल वाहतुकीसाठी खुले केले जाईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.





