Saturday, October 17, 2026

BMC News : पाच वर्षांतच गारोडिया नगरमधील पाच रस्त्यांचा पुन्हा विकास; तब्बल साडेचार कोटी रुपये केले जाणार खर्च

मुंबई महापालिकेकडून गारोडिया नगर परिसरातील पाच रस्त्यांचा अवघ्या पाच वर्षांत पुन्हा विकास केला जाणार आहे. या कामासाठी सुमारे साडेचार कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पुनर्विकासामुळे रस्त्यांची स्थिती सुधारण्याची अपेक्षा असली, तरी इतक्या कमी कालावधीत पुन्हा कामे का हाती घ्यावी लागत आहेत, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पूर्व उपनगरातील घाटकोपर (पूर्व) मधील गारोडिया नगर वसाहतील खासगी रस्त्यांचा विकास पाच वर्षांपूर्वी करण्यात आल्यानंतर आता याच रस्त्यांचा विकास मास्टीक अस्फाल्टद्वारे केला जाणार आहे. या खासगी वसाहतीतील ५ रस्त्यांचा विकास मास्टीक अस्फाल्टद्वारे करण्यासाठी तब्बल साडेचार कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे

घाटकोपर पूर्व येथे गरोडिया नगर येथील ०९ रस्ते 'सार्वजनिक रस्ते' म्हणून घोषित करण्यात आले होते. यातील दोन रस्त्यांचा विकास सिमेंट काँक्रिटद्वारे करण्यात आला होता. तर ०७ रस्त्यांचा विकास डांबरीकरणाद्वारे करण्यात आला होता. डांबरीकरणाद्वारे बनवलेल्या या सात रस्त्यांपैँकी ५ रस्त्यांची अवस्था खराब असल्याने आता पुन्हा या रस्त्यांचा विकास केला जाणार आहे. या सातही रस्त्यांचे डांबरीकरण २०२१मध्ये पूर्ण करण्यात आले होते आणि आता पाच वर्षांतच पुन्हा या रस्त्यांचे डांबरीकरणाद्वारे विकास करण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. स्थानिक आमदार पराग शाह यांच्या पत्राच्या विनंतीनुसार या पाच रस्त्यांच्या विकासाद्वारे हे काम केले जात असल्याचे रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

गारोडिया नगरच्या स्थानिक रहिवाशांना लवकरात लवकर दिलासा देण्यासाठी व त्यांचा त्रास कमी करण्यासाठी सदर बाबी लक्षात घेता, घाटकोपर (पूर्व) मधील गारोडिया नगर लेआउट मधील स्थानिक रहिवाशांना लवकर आराम देण्यासाठी आणि त्रास कमी करण्यासाठी वरील पाच मुख्य डांबरी रस्त्यांचे पुनर्पूष्ठीकरण करण्याचे काम हाती घेण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या पाच रस्त्यांच्या विकासासाठी ४.३६ कोटी रुपये खर्च क करण्यात येणार असून यासाठी ए. के. कॉर्पोरेशन या कंपनीची निवड करण्यात आली आहे.

तात्काळ सुधारणा करण्यात येणारे गारोडिया नगरमधील हे पाच रस्ते

• युनियन बैंक लेन

• पुष्पा हॉटेल समोरील लेन नीलकंठ कुंज बिल्डिंग ते नीलकंठ टॉवर

• नीलकंठ टॉवर ते कुकरेजा टॉवर पर्यतची लेन

• नीलकंठ टॉवर ते गुरु दर्शन बिल्डिंग पर्यतची लेन

• गोवर्धन धाम बिल्डिंग ते गारोडिया नगर स्कूल पर्यतची लेन

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >