दिवाळीत घरच्या घरी बनवा काजू कतली; तोंडात टाकताच विरघळणारी सोपी रेसिपी!"
←
२ कप ताजे काजू, १ कप साखर, आणि अर्धा कप पाणी.
अगदी मोजक्या साहित्यात बनते ही मिठाई!
←
सोबत घ्या १ चमचा तूप, थोडासा चांदीचा वर्ख आणि वेलची पूड स्वादासाठी.
←
सर्वात आधी काजू मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक पावडर करून घ्या. (लक्षात ठेवा, मिक्सर सतत न चालवता थांबवून फिरवावा).
←
आता कढईत साखर आणि पाणी एकत्र करून एकत्र पाक तयार करून घ्या. पाकात वेलची पूड टाका.
←
पाकात काजू पावडर हळूहळू घालून मिश्रण मंद आचेवर घट्ट होईपर्यंत सतत ढवळत राहा.
←
मिश्रण थोडे थंड झाल्यावर तूपाच्या मदतीने मळून घ्या आणि बटरपेपरवर हलक्या हाताने लाटून घ्या.
←
त्यावर चांदीचा वर्ख लावून आवडीनुसार डायमंड शेपमध्ये कापा! तयार आहे तुमची खमंग आणि सुंदर 'काजू कतली'.
←
हे पण बघा
←
←