Home क्रीडा आयपीएल मुंबई क्लिन बोल्ड, राजस्थानचा ‘रॉयल’ विजय

मुंबई क्लिन बोल्ड, राजस्थानचा ‘रॉयल’ विजय

1

आयपीएलच्या सहाव्या मोसमात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा ८७ धावांनी पराभव करून गुणतक्त्यात अव्वल स्थान पटकावले.

जयपूर- आयपीएलच्या सहाव्या मोसमात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा ८७ धावांनी पराभव करून गुणतक्त्यात अव्वल स्थान पटकावले. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजीकरत तीन बाद १७९ धावा केल्या होत्या.  मात्र मुंबईच्या फलंदाजींना साफ निराशा केली. मुंबईचा डाव केवळ ९२ धावात संपुष्ठात आला.

आयपीएलच्या सर्व अपडेटसाठी येथे क्लिक करा.

त्याआधी नाणेफेक जिंकून राजस्थानने प्रथम फलंदाजी करण्याचा  निर्णय घेतला होता. राजस्थानकडून अजिक्य रहाणेने नाबाद ६८ धावांची खेळी केली. मुंबईकडून केव्हिन पॉलार्ड आणि हरभजन सिंगने प्रत्येकी एक गडी बाद केले.

विजयासाठी १८० धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईच्या फलंदाजींनी निराशा केली. सलामीला आलेल्या सचिन तेंडुलकर आणि कर्णधार रिकी पाँटिंग यांना हे पुन्हा एकदा अपयशी ठरले. सचिन केवळ एक धाव काढून तर पाँटिंग चार धावांवर बाद झाला. मुंबईकडून दिनेश कार्तिक (३०) आणि अंबती रायडू (२७) यांना राजस्थानच्या पुढे टिकाव धरता आला. मुंबईचा डाव ९२ धावांवर संपुष्ठात आला.

या विजयासह राजस्थानने गुणतक्त्यात अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. तर मुंबईचा संघ चौथ्या स्थानावर आहे.

राजस्थान- तीन बाद १८९

मुंबई- सर्व बाद ९२

सामनावीर- अजिंक्य रहाणे (राजस्थान)

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version