'...म्हणून धर्मवीर चित्रपटाचा शेवट उद्धव ठाकरेंनी पाहिला नाही'

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेचे लोकप्रिय नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर हा चित्रपट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच पाहिला. पण चित्रपटाचा शेवट पाहणे त्यांनी टाळले. या संदर्भात भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक ट्वीट शेअर केले आहे. 'दुःखद शेवट पाहू शकणार नाही म्हणून उद्धव ठाकरे यांनी चित्रपटाचा शेवट पाहणे टाळले? असं समजू नका.


चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय मंत्री राणे साहेबांची प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांनी शेवट पाहिला नाही. यावरून हे देखील कळते की, शिवसेनेच्या उभारणीत उद्धव ठाकरे हे नव्हते. सत्य नेहमीच बोचरे असते', असे ट्वीट नितेश राणे यांनी शेअर केले आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवट पाहणे टाळले. याचे कारण देखील त्यांनी सांगितले होते. ते म्हणाले, 'मी चित्रपटाचा शेवट पाहू शकलो नाही. आनंद दिघे यांच्या अपघातानंतर मी व्यतिथ झालेले बाळासाहेब पाहिले आहेत. आनंद दिघे यांचा मृत्यू शिवसैनिकांवर आघात होता,' असे मुख्यमंत्री म्हणाले होते. प्रवीण तरडे यांनी धर्मवीर या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Comments
Add Comment

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य