मुंबईत अवघ्या दीड वर्षाच्या बाळावर अत्याचार

मुंबई : मुंबईतल्या वरळी परिसरात एका नराधमाने अवघ्या दीड वर्षाच्या बाळावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. बाळाच्या आई-वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ३५ वर्षांच्या नराधमाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात भादंवि कलम ३७६ आणि पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलामांर्गत गुन्हा दाखल केला आहे.


मुंबईतल्या वरळी परिसरातील एक कुटुंबात १८ महिन्यांच्या मुलीची आई घराबाहेर गेली होती. तेव्हा नराधमाने या मुलीला स्वतःच्या घरी नेले आणि तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. अत्याचार झाल्यामुळे अवघ्या अठरा महिन्यांची मुलगी जीवाच्या आकांताने रडत होती. तिचा टाहो असह्य होऊन कुटुंबाने तिला रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी केली, तेव्हा या मुलीवर अत्याचार झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे आई-वडिलांसह कुटुंबाच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी जवळच्या पोलिस ठाण्यात जात तक्रार नोंदवली.


अवघ्या दीड वर्षाच्या बाळावर नराधमाने अत्याचार केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप आणि रोष आहे. बाळ सुरक्षित नसेल, तर कसे, असा सवाल विचारला जातो आहे. याप्रकरणी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी होत आहे.

Comments
Add Comment

Mumbai Municipal Corporation : कंत्राट कामांंचे पैसे रोखले, १३ कोटींच्या तुलनेत ६६ कोटी रुपये देण्याची आली वेळ

खाते गोठवण्याचा न्यायालयाच्या भीतीने प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीने केला मंजूर महापालिकेच्या मलनि:सारण

BMC : मुंबईत अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी ७६ वाहने तैनात

फेरीवाल्यांसह अतिक्रमण मुक्त पदपथ मोहिमेला आणि अधिक बळकटी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने

Modak Mahotsav 2026 : एफडीएच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचा मोदक महोत्सव

महिला बचत गटांना अन्न सुरक्षा प्रशिक्षण मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागांतर्गत

Karad News: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बंधूचे निधन

कराड: महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या चुलत बंधूंचं निधन झालं

Thane Metro: ठाणे मेट्रो केव्हापासून सुरू होणार? परिवहन मंत्र्यांनी सर्व काही सांगून दिलं...

ठाणे: ठाणेकरांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ठाणेकर ज्या क्षणाची आतुरतेने वाट

Ganpati Idol News: दीड दिवसाच्या गणपतीला आज निरोप, ढोल ताशाच्या गजरात साश्रुनयनांनी गणेश मुर्तींचे विसर्जन

मुंबई: "गणपती बाप्पा मोरया, मंगल मुर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" या जयघोषात साश्रुनयनांनी मुंबई आणि