Thane Metro: ठाणे मेट्रो केव्हापासून सुरू होणार? परिवहन मंत्र्यांनी सर्व काही सांगून दिलं...

ठाणे: ठाणेकरांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ठाणेकर ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो क्षण आला आहे. गायमुख ते कापूरबावडी मार्गावर ठाणे मेट्रो मार्गाची चाचणी यशस्वी पार पडली आहे, या मार्गावर डिसेंबरपर्यंत मेट्रो सेवा सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. परिवहन मंत्र्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, त्यांनी येत्या डिसेंबरपासून ठाणे मेट्रो सेवा सुरू करण्याच्या दिशेने ठोस पाऊल उचलण्यात आल्याची माहिती मिळाली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी एक्स या प्लॅटफॉर्मवरून ठाणेकरांना माहिती दिलीये.



शेअर केलेल्या पोस्टमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, "ठाणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी! गायमुख ते कापूरबावडी या मेट्रो मार्गाची यशस्वी चाचणी पूर्ण झाली असून, डिसेंबरपर्यंत मेट्रो सेवा सुरू करण्याच्या दिशेने ठोस पाऊल पडले आहे. या मार्गामुळे गायमुख, कासारवडवली, वाघबीळ, मानपाडा, टिकुजिनीवाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन, कापूरबावडी आणि परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ठाणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर होण्यास मदत होईल. ठाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या सुविधांसाठी मेट्रोसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देणे ही काळाची गरज आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ठाणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा मिळणार आहे."

 



ठाण्यात वाहतुकीचे प्रमाण वाढत असताना आणि कार्यक्षम सार्वजनिक वाहतुकीच्या पर्यायांची मागणी वाढत असतानाच, ही चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. जर डिसेंबरपासून मेट्रो सेवा सुरू झाली तर, हा मेट्रो मार्ग वेगाने विकसित होत असलेल्या निवासी भागांमधून ठाण्याच्या प्रमुख भागांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक पर्याय उपलब्ध करून देऊ शकतो. सरनाईक म्हणाले की, ही यशस्वी चाचणी डिसेंबरपर्यंत मेट्रो कार्यान्वित करण्याच्या दिशेने टाकलेले एक ठोस पाऊल उचलले आहे. गेल्या वर्षी सुद्धा ठाणे मेट्रोची ट्रायल रन घेण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मेट्रोचे ट्रायल रन घेण्यात आली. ठाणेकरांच्या सेवेमध्ये मेट्रो आल्यास हजारो ठाणेकरांना ट्रॅफिकमधून दररोज करावा लागणारा प्रवास कायमचा बंद होईल. पिक अवरच्या काळामध्ये मोठ्या संख्येने गाड्यांची आणि नोकरदारांची एकच गर्दी असते.

Comments
Add Comment

Ganpati Idol News: दीड दिवसाच्या गणपतीला आज निरोप, ढोल ताशाच्या गजरात साश्रुनयनांनी गणेश मुर्तींचे विसर्जन

मुंबई: "गणपती बाप्पा मोरया, मंगल मुर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" या जयघोषात साश्रुनयनांनी मुंबई आणि

Lalbaugcha Raja Update : 'लालबागच्या राजा'च्या दरबारी मीडियाची कोंडी! अधिकृत पास असूनही पोलिसांनी अडवल्याने पत्रकार आक्रमक

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध 'लालबागच्या राजा'च्या (Lalbuagcha Raja 2026) दर्शनासाठी गणेशोत्सवादरम्यान (Ganeshotsav 2026) दरवर्षी लाखो

US Ambassador Sergio Gor : 'लालबागच्या राजा'च्या दरबारी अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर; दर्शन घेत म्हणाले, "येथील ऊर्जा आणि उत्साह अद्भुत!"

मुंबई : गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर भारतातील अमेरिकेचे राजदूत (Ambassador of the United States of America ) सर्जिओ गोर (Sergio Gor) यांनी मुंबईतील

Police Rescue : विरारमध्ये पोलिसांच्या तत्परतेने टळला अनर्थ; आर्थिक विवंचनेतून चिमुकल्या मुलींसह आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कुटुंबाचे वाचले प्राण

विरार: आर्थिक विवंचना, कौटुंबिक तण

Parag Shah : ३,३८३ कोटींच्या मालमत्तेचे मालक असलेले भाजप आमदार पराग शाह घाटकोपरमध्ये झाले एका दिवसासाठी 'भिकारी'; नेमका प्रयोग कशासाठी?

मुंबई:

Amit Shah Ganpati Darshan : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले सहकुटुंब 'लालबागच्या राजा'चे दर्शन; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची विशेष उपस्थिती