भिवंडीत इमारतीचा भाग कोसळून एकाचा मृत्यू

भिवंडी : भिवंडी शहरालगतच्या खोणी ग्रामपंचायत हद्दीतील खाडीपार या भागात रस्त्यालगत असलेल्या मूलचंद कंपाऊंड येथे एका इमारतीचा पुढील काही भाग कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत एक व्यक्तीचा मृत्यू झाला.


पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास झालेल्या दुर्घटनेत इमारती लगत रस्त्याकडेला आठ दुकानाचे गाळे बनवण्यात आले होते. या दुकानांवर इमारतीच्या स्लॅबचा भाग कोसळून ही दुर्घटना घडली. यावेळी कपड्याचे दुकान असलेल्या गाळ्यामध्ये दुकानचालक माजिद अन्सारी (वय २५) हा झोपलेला असल्याने त्याच्यावर इमारतीचा ढिगारा कोसळल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला.



या दुर्घटनेची माहिती मिळतात भिवंडी अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी ढिगारा उपसून त्यामध्ये अडकलेला मृतदेह बाहेर काढून तो शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.


दरम्यान घटनास्थळी पोलीस अधिक चौकशी करत आहेत. धोकादायक इमारतींना नोटीस बजावण्यात आली आहे. पण कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे अशा घटना घडत असतात. अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : राम मंदिर परिसरातील सार्वजनिक शौचालयात रासायनिक वायू गळती, 2 तरुणांचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील (Mumbai) राम मंदिर परिसरात सार्वजनिक शौचालयात रासायनिक वायूसारखा वास पसरल्याने दोन जणांचा मृत्यू

BMC Health Department : केईएम, शीव रुग्णालयातील एंडोस्कोपिक मशीन्सची खरेदी बाळगळली

तीन वर्षांपूर्वी खरेदीला दिलेल्या मंजुरीचा प्रस्ताव आता रद्द करायला निघाले प्रशासन मुंबई (सचिन धानजी) : मुंबई

Dengue Cases Mumbai : डेंग्यू, मलेरियाच्या आजारांत वाढ, महापालिकेच्यावतीने धुम्रफवारणीकरता टॅमिफॉस आणि ऍल्युमिनियम फॉस्फाईड

तब्बल दहा महिन्यांपासून निविदेत अडकली होती औषध खरेदी मुंबई (सचिन धानजी) मुंबईत सध्या साथीच्या आजारांच्या

Mumbai Ganeshotsav 2026 : मुंबईत यंदा तब्बल साडे नऊ हजारांहून बाप्पा झाले कमी

सार्वजनिक ५२ मंडळांचे गणपती वाढले, पण घरगुती गणपतींची संख्या घटली मुंबई (सचिन धानजी) : मुंबईत गणरायांचे आगमन

Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तीन वाहनांचा भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू, एक गंभीर

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाट परिसरात शनिवारी दुपारी तीन वाहनांचा अपघात झाला. दोन आयशर टेम्पो आणि

Prahaar Trailer: उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकचा ट्रेलर मुंबईच्या ऐतिहासिक ठिकाणी रिलीज होणार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला...

मुंबई: गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर अनेक बायोपिकने चांगलाच धुमाकूळ घातला. त्या व्यक्तीच्या आयुष्य रूपेरी पडद्यावर