BMC Health Department : केईएम, शीव रुग्णालयातील एंडोस्कोपिक मशीन्सची खरेदी बाळगळली

तीन वर्षांपूर्वी खरेदीला दिलेल्या मंजुरीचा प्रस्ताव आता रद्द करायला निघाले प्रशासन


मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांकरिता एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंडच्या (ईयूएस) दोन मशिन्स खरेदीचा प्रस्ताव गुंडाळला. या मशिन्स डॉलरच्या भावामध्ये खरेदी करण्यास सन २०२३मध्ये मंजुरी देण्यात आली होती. परंतु स्थायी समितीच्या मंजुरीनंतर रुग्णालयांच्या व्यवस्थापनाने यामध्ये त्रुटी दाखवून यासाठीची नवीन निविदा काढण्याचा निर्णय घेतला. मात्र, यासाठी मंजूर केलेला ठराव रद्द करण्यासाठी प्रशासनाला तब्बल ३ वर्षांनी जाग आली. तब्बल तीन वर्षांनी स्थायी समितीने मंजूर केलेला ठराव रद्द करण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव सादर केला असून यामुळे आरोग्याच्या प्रश्नाबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले आहे.


मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांकरिता एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड(ईयूएस) प्रोसेसर विथ लिनियर इकोएंडोस्कोप विथ स्टँडर्ड ऍक्सेसरीसह ०२ मशिन्सची खरेदी आणि उभारणीसह ३ वर्षांचा कालावधी आणि पुढील पाच वर्षांची देखभाल आदींच्या प्रस्तावाला १६ जून २०२३ रोजी स्थायी समितीने मंजुरी दिली होती. यातील एक मशिन केईएम रुग्णालयाकरता आणि एक मशिन शीव लोकमान्य टिळक रुग्णालयाकरता खरेदी करण्यात येणार होत्या.


या दोन मशिन्सकरता पेन्टॅक्स मेडिकल इंडिया प्रा.लि. या कंपनीची निवड करण्यात आली होती. या दोन मशिन्सच्या खरेदीकरता ३. ८० कोटी रुपये अधिक मुलभुत कस्टम ड्युटी, सोशल वेल्फेअर कर, आयजीएसटी व बँकचा सोडवणुकीचा आकार इत्यादी करिता २७.३२ टक्के प्रमाणे १.०४ तसेच डॉलरच्या दरात वाढ झाल्यास यंत्राच्या किमतीत वाढ होऊ शकते याकरिता ४टक्के प्रमाणे भौतिक सादीलवार १९,३७ लाख तसेच यंत्राची ५ वर्षाचे देखभाल यासाठी ५०.०७लाख रुपये याप्रमाणे एकूण सुमारे ५.५४ कोटी रुपये एवढ्या किंमतीच्या कंत्राट कामाला मंजुरी देण्यात आली होती.


मात्र, या कामाला मंजुरी जून २०२३ रोजी दिल्यानंतर या एकमेव कंपनीकडून दिला जाणार दर हा वैद्यकिय महाविद्यालयातील विभागप्रमुखांनी दिलेल्या कार्यालयीन अंदाजीत खर्चापेक्षा ४.९७ टक्के ने जास्त आहे. त्यामुळे निविदेस अधिक कंपनींचा प्रतिसाद मिळायला हवा तसेच तसेच स्पर्धात्मक दर प्राप्त होण्यासाठी यंत्राचा तांत्रिक तपशिलात सुधारणा करून ही निविदा रद्द करण्यासाठी व नवीन निविदा मागविण्यासाठी २५ ऑक्टोबर २०२३ अन्यये प्रशासकीय मंजुरी दिली.


त्यामुळे निविदा मागवून स्थायी समितीची मंजुरी घेतल्यानंतर रुग्णालय व्यवस्थापनाला चार महिन्यांनी जाग आली आणि त्यांनी ही निविदा रद्द करून फेरनिविदा मागवण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे स्थायी समितीचा ठराव झाल्यानंतर आणि प्रशासनाने फेरनिविदा मागवण्याचा निर्णय घेतल्यानंतरही तीन वर्षे उलटली. आता तीन वर्षांनंतर प्रशासन जागे झाले असून या दोन मशिन्सच्या खरेदीची किती तातडी होती आणि याबाबत तेव्हा प्रशासनाने योग्य निर्णय का घेतला नाही असा सवाल उपस्थित होत आहे.

Comments
Add Comment

Dengue Cases Mumbai : डेंग्यू, मलेरियाच्या आजारांत वाढ, महापालिकेच्यावतीने धुम्रफवारणीकरता टॅमिफॉस आणि ऍल्युमिनियम फॉस्फाईड

तब्बल दहा महिन्यांपासून निविदेत अडकली होती औषध खरेदी मुंबई (सचिन धानजी) मुंबईत सध्या साथीच्या आजारांच्या

Mumbai Ganeshotsav 2026 : मुंबईत यंदा तब्बल साडे नऊ हजारांहून बाप्पा झाले कमी

सार्वजनिक ५२ मंडळांचे गणपती वाढले, पण घरगुती गणपतींची संख्या घटली मुंबई (सचिन धानजी) : मुंबईत गणरायांचे आगमन

Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तीन वाहनांचा भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू, एक गंभीर

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाट परिसरात शनिवारी दुपारी तीन वाहनांचा अपघात झाला. दोन आयशर टेम्पो आणि

Prahaar Trailer: उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकचा ट्रेलर मुंबईच्या ऐतिहासिक ठिकाणी रिलीज होणार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला...

मुंबई: गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर अनेक बायोपिकने चांगलाच धुमाकूळ घातला. त्या व्यक्तीच्या आयुष्य रूपेरी पडद्यावर

Mumbai Ganpati Visarjan: मुंबईकरांनी साश्रूनयनांनी लाडक्या बाप्पाला दिला निरोप, विसर्जनाच्या दिवशी 35,000 हून अधिक मूर्तीचे विसर्जन

मुंबई: साश्रूनयनांनी काल लाडक्या बाप्पााला निरोप देण्यात आला. मुंबईमध्ये अनेक मानाच्या गणपतींसह इतरत्र

महाराष्ट्रात ‘SIR’ बाबत दावे- हरकतींसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचा निर्णय

मुंबई: विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेत महाराष्ट्रातील मतदारांना दावे आणि हरकती दाखल