मुंबई : नानी अभिनीत ‘द पॅराडाईज’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईत दुसऱ्या दिवशी मोठी घट झाली आहे. बुधवारी झालेल्या पेड प्रिव्ह्यूमध्ये चित्रपटाने 11.60 ...
मध्य रेल्वेवरील कायमच गजबजलेलं स्थानक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलकडे पाहिलं जातं. या स्थानकावरून उपनगरीय लोकल आणि देशभरातील लांबपल्ल्याच्या मेल- एक्स्प्रेस धावतात. 26 नोव्हेंबर 2008 रोजी रात्रीच्या अजमल कसाब नावाच्या दहशतवाद्याने मुंबई सीएसएमटी स्थानकासह ताज हॉटेल आणि काही ठिकाणी बेछुट गोळीबार करत शेकडो नागरिकांचे प्राण त्याने घेतले होते. या घटनेविषयी आजही बोलताना आपसुकच मुंबईकरांच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. याच प्रकरणावर आधारित 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' चित्रपटाचा ट्रेलर येत्या 29 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात येणार आहे.
अनेक सेलिब्रिटींना आपण रेल्वे स्टेशन किंवा मेट्रो स्टेशनवर आपल्या चित्रपटांचं प्रमोशन करताना पाहिलं आहे. पण पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाचा ट्रेलर एका रेल्वे स्थानकावरून रिलीज करण्यात येणार आहे. अनेक संवेदनशील खटल्यांमध्ये सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. त्यांनी 1993 चा मुंबई बॉम्बस्फोट, 2008 चा 26-11 चा मुंबई दहशतवादी हल्ला यांसारख्या देशातील सर्वात संवेदनशील खटल्यांमध्ये त्यांनी सरकारची बाजू मांडली होती. त्यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना 26-11 हल्ल्याचा मास्टरमाईंड अजमल कसाबला कशापद्धतीने त्यांनी फाशीपर्यंत पोहोचवलं? कशापद्धतीने कोर्टामध्ये त्यांनी युक्तीवाद केला? हे सर्व मुद्दे आपल्याला चित्रपटामध्ये पाहायला मिळतील.
मुंबई: ओटीटी गाजवल्यानंतर बॉक्स ऑफिसवर 'मिर्झापूर: द मुव्ही' चित्रपट रिलीज झाला होता. ओटीटी प्रमाणेच त्याला बॉक्स ऑफिसवरही चांगलेच सक्सेस मिळाले होते. ...
'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' चित्रपट येत्या 16 ऑक्टोबर 2026 रोजी बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये राजकुमार राव सह मराठमोळा अभिनेता ललित प्रभाकर सुद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटामध्ये 26-11 च्या हल्ल्यातला दहशतवादी अजमल कसाबची भूमिका लोकप्रिय मराठमोळा अभिनेता ललित प्रभाकर ही भूमिका साकारत आहे. राजकुमार राव आणि ललित प्रभाकर यांच्यासोबत चित्रपटामध्ये वामिका गब्बी, जयदीप अहलावत आणि सिकंदर खेरही प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहेत. 'पाताल लोक' आणि 'स्कूप' फेम दिग्दर्शक अविनाश अरुण यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलंय.