नोव्हाक जोकोविच ठरला किंग!

मेलबर्न (वृत्तसंस्था) : टेनिसचा स्टार खेळाडू असणाऱ्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच याने त्याच्या मानाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला आहे. ऑस्ट्रेलिया ओपनच्या पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये त्याने ग्रीसच्या स्टिफानोस त्सिस्तिपास याचा पराभव केला आहे. नोव्हाकने स्टिफनोस याला ६ -३, ७-४ आणि ७ - ६ अशा फरकाने पराभूत करत ऑस्ट्रेलियन ओपन ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. विशेष म्हणजे यासोबत त्याने स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालच्या ग्रँडस्लॅमच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. नोव्हेकने ऑस्ट्रेलिया ओपन जिंकल्यामुळे त्याच्याकडील ग्रँडस्लॅमची संख्या २२ झाली आहे. त्याने नदालच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.


ऑस्ट्रेलिया ओपनमधील अंतिम सामना आज नोव्हाक जोकोविच आणि स्टेफानोस सित्सिपास यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात सर्बियाचा अनुभवी टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम फेरीत जोकोविचने ग्रीसच्या स्टेफानोस सित्सिपासचा पराभव केला. जोकोविचने २ तास ५६ मिनिटे चाललेला हा सामना ६-३, ७-६, ७-५ असा जिंकला. या विजयासह जोकोविच एटीपी क्रमवारीत जगातील अव्वल क्रमांकाचा पुरुष खेळाडू बनला आहे.


विजेतेपदाच्या लढतीत जोकोविचने शानदार सुरुवात केली आणि पहिला सेट ६-३ आणि दुसरा सेट ७-६ असा जिंकला. आता दुसरा सेट जिंकून जोकोविच हा सामना जिंकेल असे वाटत होते आणि तसेच झाले. ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचणारा २४ वर्षीय सित्सिपास हा दुसरा सर्वात तरुण पुरुष खेळाडू आहे. त्याआधी जोकोविचने २०११ मध्ये वयाच्या २३व्या वर्षी अंतिम फेरी गाठली होती. जोकोविच आणि त्सित्सिपासमध्ये जो जेतेपद पटकावेल तो एटीपी रँकिंगमध्ये नंबर वन होईल आणि हा सामना जिंकून शेवटी जोकोविच विजयी ठरला.

Comments
Add Comment

Duleep Trophy Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं शतक अवघ्या ८ धावांनी हुकलं; सचिनचा 'तो' विक्रम मोडण्याची संधी गमावली

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) दमदार फलंदाजी करत सर्वांचे

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.