IND vs NZ: वनडे मालिकेत रोहित शर्मा नाही तर विराट कोहली ठोकेल शतक! दिग्गज खेळाडूने वर्तवलं भाकीत

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी20 मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेत भारताने 3-2 ने बाजी मारली. आता भारतीय संघ वनडे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडून फार अपेक्षा आहेत.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका होत आहे. 4 नोव्हेंबरपासून या मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेत एकूण पाच सामने होणार असून रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींची उत्साह शिगेला पोहोचला आहे. कारण हे दोघेही आता फक्त वनडे फॉर्मेटमध्ये खेळत असल्याने क्रीडाप्रेमींना या दोघांना खेळताना पाहण्याची पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. या मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा आक्रमक अंदाज पाहण्याची पर्वणी असणार आहे. असं असताना या मालिकेपूर्वी भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा याने एक मोठं विधान केलं आहे. चेतेश्वर पुजाराच्या मते, न्यूझीलंडच्या वेगवान आणि स्विंग असलेल्या चेंडूंचा सामना करणं भारतीय सलामीवीरांना कठीण आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या तुलनेत विराट कोहलीला शतक ठोकण्याची सर्वाधिक संधी आहे. जियोस्टारवर बोलताना पुजाराने या दोन्ही खेळाडूंच्या क्रमाबाबत आणि त्यांच्या भूमिकेबाबत स्पष्ट काय ते सांगून टाकलं.

काय म्हणाला चेतेश्वर पुजारा?


चेतेश्वर पुजारा म्हणाला की, रोहित शर्माचं काम पावरप्लेमध्ये वेगाने धावा करून संघाला चांगली सुरूवात करून देण्याचं आहे. पण न्यूझीलंडच्या परिस्थितीत सलामीच्या फलंदाजांना नव्या चेंडूंचा सामना करताना काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे रोहित शर्माला फलंदाजी करताना अडचण येऊ शकते. पण या उलट विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. त्यामुळे वनडे फॉर्मेटमध्ये डावाला दिशा देण्याची अधिक संधी मिळते. पुजाराच्या मते, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन डाव सांभाळत शतक करणं थोडं सोपं असतं. त्यामुळे रोहित शर्मापेक्षा विराट कोहली पुढे असणार आहे. असं असलं तरी दोन्ही खेळाडू फॉर्मात आहेत, हे विसरून चालणार नाही.



वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत विराट कोहलीने नाबाद 139 धावांची खेळी केली होती. तर रोहित शर्माने तिन्ही सामन्यात मिळून 225 धावा केल्या होत्या. चेतेश्वर पुजारा फक्त विराट-रोहितबाबत मालिकेत काय घडणार? यावरच बोलला नाही तर भारतीय संघ दोन भागात विभागल्याबाबतही भाष्य केलं आहे. पहिल्या तीन सामन्यात एक संघ आणि शेवटच्या दोन सामन्यात काही खेळाडूंना वगळून संघ असणार आहे. कारण कसोटी मालिकेच्या तयारीसाठी असा निर्णय घेतला गेला आहे. पण यामुळे न्यूझीलंडला फायदा होईल, असं मत चेतेश्वर पुजारा यांनी व्यक्त केलं आहे. कारण न्यूझीलंडचा संघ पाचही सामन्यात एकाच कॉम्बिनेशनसह खेळणार आहे. त्यामुळे शेवटच्या दोन सामन्यात भारतीय संघाला अडचणीचं ठरू शकते.
Comments
Add Comment

IND vs NZ: पाचवा टी20 सामना जिंकल्यानंतर मिचेल सँटनरने मालिकेबाबत केलं मोठं विधान, तसं झालं असतं तर...

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा टी20 सामना हॅमिल्टनच्या सेडन पार्क येथे पार पडला. या सामन्यात न्यूजीलंडने 7

संजू सॅमसनसाठी काय पण..! ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याची आर अश्विनने केली बोलती बंद

भारत न्यूझीलंड टी20 मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेत भारताने 3-2 ने आघाडी घेतली आणि मालिका खिशात घातली. भारताने ही

माझं काम सर्वांना खूश करण्याचं नाही...! संघ निवडीच्या प्रश्नावर प्रशिक्षक गौतम गंभीरचं सडेतोड उत्तर

न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने न्यूझीलंडला टी20 मालिकेत 3-2 ने पराभूत केलं. या मालिकेतील शेवटच्या दोन

IND vs NZ: षटकारांचा पाऊस आणि धावांचा पूर! भारत-न्यूझीलंड टी20 मालिकेत मोडले अनेक जागतिक रेकॉर्ड्स

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी20 मालिका नुकतीच पार पडली. भारताने ही मालिका 3-2 अशा फरकाने आपल्या नावावर केली असली,

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या दोन सामन्यात काय चुकलं? कर्णधार श्रेयस अय्यरने या चुका काढल्या

न्यूझीलंडने पाचव्या टी20 सामन्यात भारताचा 7 गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 192

IND vs NZ: पाचव्या टी20 सामन्यातही भारताचा पराभव, न्यूझीलंडने 7 विकेट्सने सामना जिंकला

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेचा निकाल 3-2 असा लागला. भारताने या तीन सामने जिंकल्याने