काय म्हणाला न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर?
पाचव्या टी20 सामन्यातील विजयानंतर मिचेल सँटनर म्हणाला की, मालिकेबाबत आम्ही नक्कीच विचार करू. सँटनरने पुढे सांगितलं की, 'आम्हाला माहित आहे की एक खूप चांगल्या संघाविरुद्ध ही अतितटीची मालिका होती. पण हो तुम्ही म्हणालात त्या प्रमाणे पहिल्या काही सामन्यात असे काही क्षण होते जिथे आम्ही कदाचित जिंकू शकलो असतो किंवा जिंकायलाच पाहिजे होते. जर तसं झालं असतं तर या मालिकेचा निकाल काही वेगळा लागला असता.'
न्यूझीलंडने पाचव्या टी20 सामन्यात भारताचा 7 गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 192 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र हे ...
मिचेल सँटनर पुढे म्हणाला की, 'क्रिकेटच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर या मालिकेत बऱ्याच चांगल्या गोष्टी घडल्या. फलंदाजी चांगली झाली आणि आमच्या खेळाडूंनी गेल्या काही सामन्यात गोलंदाजीतही उत्कृष्टपणे कामगिरी केली. ही सकारात्मक बाब आहे. अर्थात मालिका भारताच्या बाजूने 3-2 अशी आहे. पण निकाल याच्या उलटही लागू शकला असता. '
ग्लेन फिलिप्सच्या सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल सँटनर म्हणाला की, प्रत्येक सामन्यात अशी कामगिरी करणं खूप विशेष आहे. तो स्वतःला थोडा वेळ देतो आणि मग तो योग्य ठिकाणी फटके मारू शकतो, काही जोरदार फटके खेळू शकतो. जसं आपण पाहिलं आहे, एका चांगल्या गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध. तो एक उत्तम संघ आहे. त्यामुळे त्याने प्रत्येक सामन्यात अशी कामगिरी करणं आणि फलंदाजीने आम्हाला चांगल्या स्थितीत आणणं, जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात, मला वाटतं की फलंदाजी खूप चांगली झाली आहे. बहुतेक सामन्यांमध्ये 200 धावा आणि अर्थातच 260 धावा सुद्धा. तर हो, आणि तो त्यात एक महत्त्वाचा भाग होता.