शिक्कामोर्तब झाले, जसप्रीत बुमराह खेळणार...

मुंबई (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियाचा संघ पुढील महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात बॉर्डर - गावसकर करंडकसाठी ४ कसोटी सामने आणि त्यानंतर तीन एकदिवसीय सामने दोन्ही संघांमध्ये खेळविले जाणार आहेत. या महत्त्वाच्या दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या फिटनेसबाबत एक मोठे अपडेट पुढे आले आहे. तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत खेळण्यासाठी तंदुरुस्त ठरला असून भारतीय संघाचा एक भाग असू शकतो.


वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बऱ्याच दिवसांपासून दुखापतीशी झुंजत आहे. बुमराह हा दुखापतीमुळे न्यूझीलंड मालिकेतही संघात सहभागी होऊ शकलेला नाही. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. मात्र तो आता पुन्हा एकदा संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. इनसाइडस्पोर्टच्या एका बातमीनुसार, तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना दिसणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १७ मार्चपासून ३ सामन्यांची वनडे मालिका खेळविली जाणार आहेत. या मालिकेतून जसप्रीत बुमराह संघात पुनरागमन करू शकतो. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी तो तंदुरुस्त होईल, अशी आम्हाला आशा आहे. पण त्याच्या प्रगतीवर ते अवलंबून असेल.


जुलै २०२२ मध्ये इंग्लंड दौऱ्यानंतर जसप्रीत बुमराहच्या कंबरेला ‘स्ट्रेस फ्रॅक्चर’ झाला होता. या दुखापतीमुळे गतवर्षी आशिया चषक आणि टी-२० विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेतुन तो बाहेर गेला होता. बुमराहने टीम इंडियासाठी आतापर्यंत ३० कसोटी सामने, ७२ एकदिवसीय आणि ६० टी-२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत १२८, एकदिवसीय सामन्यात १२१ आणि टी २० मध्ये ७० विकेट्स घेतल्या आहेत.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून