‘आय लव्ह मोखाडा’ ठरतोय सेल्फी पाईंट

मोखाडा: मोखाडा शहरात प्रवेश करतांना नजरेत येणारा तलाव आहे, या तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले असून, “ I Love Mokhada"(‘आय लव्ह मोखाडा’) हा नामफलक चाकरमान्यांसह स्थानिकांसाठी सेल्फी पाईंट ठरत आहे. मोखाडा शहर स्वच्छ व सुंदर दिसावे, भविष्यात मोखाड्यात पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी नगरपंचायतीच्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत़.

दिवसभरातील कामाचे टेन्शन कमी करण्यासाठी मोखाड्यातील तलाव हा येथील नागरिक तसेच प्रवाशांचा सायंकाळी विरंगुळाचे ठिकाण ठरत होता़ ग्रामीण भागातील नागरिक शासकीय कार्यालयातील कामानिमित्त व वैयक्तिक कामानिमित्त तालुक्यात आल्यानंतर पार्किंगची समस्या निर्माण होत होती, परंतु अशा वेळेस मोखाड्याचा तलाव पुन्हा एकदा पार्किंगचे ठिकाण बनत असे़ मात्र, यावेळी मोखाडा नगरपंचायत नगराध्यक्ष अमोल पाटील यांच्या संकल्पनेतून तलावाजवळ लावलेला “ I Love Mokhada " हा नामफलक आता सेल्फी पाईंट ठरत आहे.

स्थानिक नागरिकांसह तालुक्याला येणाऱ्या चाकरमान्यांना तलावाजवळ लावलेल्या या नामफलकाचे कौतुक वाटत असून, बरेचजण येथे आपला सेल्फी काढून तो सोशल मीडियाद्वारे शेअर करीत आहेत़ तसेच बऱ्याचशा नागरिक, प्रवाशांनी आपले हे सेल्फी स्टेटसला सुध्दा ठेवले आहे. तर काही नागरिक आपआपल्या मोबाइलद्वारे नामफलकांसह स्वत:चा फोटो सेल्फीद्वारे चित्रबद्ध करीत आहेत, हे विशेष.
Comments
Add Comment

Mumbai Metro : गणेशोत्सवासाठी मुंबई मेट्रो सज्ज; १४ ते २५ सप्टेंबरपर्यंत वाढीव सेवा उपलब्ध

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रो वनने प्रवाशांसाठी विशेष सुविधा जाहीर केली आहे.

Ganeshotsav : मूर्तिच्या आकारापेक्षा भक्ती महत्वाची

गणेशोत्सवात आवाजाची मर्यादा पाळा अखिल सार्वजनिक गणेशोत्सव मंहासंघाचे आवाहन मुंबई (विशेष प्रतिनिधी) : डी. जे ला

Ganpati Special Train : गणेशोत्सवासाठी रेल्वेचा मोठा दिलासा; ३८६ गणपती विशेष गाड्या जाहीर, कोकणासाठी ४ अतिरिक्त गाड्यांची भर

मुंबई :

Mumbai Water Update: मुंबईकरांचं पाण्याचं टेन्शन मिटलं! भातसा तलावात ९७.४० टक्के पाणीसाठा, सध्याची परिस्थिती काय?

मुंबई: मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सातही प्रमुख

Mumbai Accident News : शिवडी वर्कशॉपमध्ये भीषण अपघात; SUVच्या धडकेत ३२ वर्षीय कामगाराचा मृत्यू

मुंबई : शिवडीतील ‘कोलगेट जेटी’ परिसरातील एका ऑटोमोबाईल वर्कशॉपमध्ये एसयूव्हीच्या धडकेत ३२ वर्षीय कामगाराचा

Devendra Fadnavis : छत्रपतींचे अनुयायी हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत! मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईत धडकण्याच्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलनासाठी येण्याचा