मुंबई : आगामी गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी आणि सोय लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. दिनांक १४ सप्टेंबर २०२६ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी रेल्वेने एकूण ३८६ गणपती विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. यामध्ये मध्य रेल्वेच्या २५८, पश्चिम रेल्वेच्या ६४, कोकण रेल्वेच्या ५८ आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या ६ विशेष गाड्यांचा समावेश आहे. तसेच, मध्य रेल्वेने ८ सप्टेंबर २०२६ पासून मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान एक नवीन दैनंदिन एक्सप्रेस गाडीही सुरू केली आहे.(Ganpati Special Train)
कोकणासाठी ४ अतिरिक्त अनारक्षित विशेष गाड्या
गणपती विशेष गाड्यांच्या भागात प्रवाशांची वाढती मागणी पाहता, मध्य रेल्वेने मुंबई आणि सावंतवाडी रोड दरम्यान ४ अतिरिक्त अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे:
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सावंतवाडी रोड (गाडी क्र. 01009): ही गाडी दिनांक १२.०९.२०२६ आणि १३.०९.२०२६ रोजी CSMT वरून दुपारी १३.४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०३.०० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल (एकूण २ सेवा).
सावंतवाडी रोड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (गाडी क्र. 01010): ही गाडी दिनांक १३.०९.२०२६ आणि १४.०९.२०२६ रोजी सावंतवाडी रोड येथून पहाटे ०४.०५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी १८.१५ वाजता CSMT येथे पोहोचेल (एकूण २ सेवा).
सांगली : औदुंबर येथील कृष्णा नदीच्या डोहात सध्या तब्बल ८ ते १० फूट लांबीची मगर वावरत असल्याचे दिसून येत आहे. दररोज सकाळच्या सुमारास ही मगर नदीकाठच्या ...
महत्त्वाचे थांबे आणि डब्यांची रचना
या विशेष गाड्या दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या स्थानकांवर थांबतील. या गाड्यांच्या संरचनेत १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन असणार आहेत.(Ganpati Special Train)
तिकीट बुकिंग आणि सुविधा
सामान्य दरांसह अनारक्षित डब्यांचे आरक्षण युटीएस प्रणालीद्वारे केले जाऊ शकते. तसेच तिकीट बुकिंगसाठी प्रवासी 'रेलवन' ॲप देखील डाउनलोड करू शकतात. गाड्यांच्या थांब्यांवरील वेळेच्या सविस्तर माहितीसाठी National Train Enquiry System (NTES) ला भेट देऊ शकता किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करू शकता.(Ganpati Special Train)
प्रवाशांसाठी रेल्वेचे महत्त्वाचे सुरक्षा आवाहन
कोणतीही अनोळखी किंवा वारसदार नसलेली बॅग, पार्सल व वस्तूंना स्पर्श करू नका.
आपले सामान प्लॅटफॉर्मवर, गाड्यांमध्ये किंवा पादचारी पुलांवर विना-देखरेख सोडू नका.
गर्दी करणे, फूटबोर्डवरून प्रवास करणे आणि धावत्या गाड्यांमध्ये चढणे किंवा उतरणे टाळा.
संशयास्पद हालचाल किंवा वस्तू आढळल्यास तात्काळ जवळच्या आरपीएफ/जीआरपी कर्मचाऱ्याला किंवा सुरक्षा हेल्पलाइन क्रमांक १३९ वर संपर्क साधा.