Ganeshotsav : मूर्तिच्या आकारापेक्षा भक्ती महत्वाची

गणेशोत्सवात आवाजाची मर्यादा पाळा


अखिल सार्वजनिक गणेशोत्सव मंहासंघाचे आवाहन


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : डी. जे ला विरोध नाही मात्र आवाजाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये, तसेच २००८ मध्ये ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत श्री च्या मूर्तिची उंची १८ फूटापेक्षा जास्त असू नये असा निर्णय झाला होता. त्यावेळी त्याची अंमलबजावणीही झाली. मात्र नंतर मूर्तिच्या उंचीची स्पर्धा चालू झाली. या संदर्भात मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी व मूर्तिकारांनीही विचार करणे आवश्यक आहे. अशी भूमिका अखिल सार्वजनिक गणेशोत्सव मंहासंघाचे प्रमुख कार्यवाह सुरेश सरनोबत यांनी मांडली. त्याच प्रमाणे मूर्तिचे विद्रूपीकरण थांबवावे. (Ganeshotsav)



१३३ वर्षाची परंपरा असलेला सार्वजनिक गणेशोत्सव संपूर्ण जगात सोमवार १४ सप्टेंबर २०२६ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत संपन्न होत आहे. राज्य शासनाने या उत्सवाला राज्य महोत्सव म्हणून घोषित केले आहे. महाराष्ट्रात उत्साहाने साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्यविभागाने मागील वर्षापासून राज्य महोत्सव म्हणून घोषित केले आहे. या वर्षी या राज्य महोत्सव अंतर्गत होणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचा विस्तार देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याचे शासनाने ठरवले आहे. त्यामुळे महाराष्ट्रासोबत देशभरात आणि जगभरात अत्यंत उत्साहाने व विधायक उपक्रमाद्वारे गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानाही या वर्षापासून स्पर्धेत सहभागी होता येणार असून त्याच्यासाठी स्वतंत्र तीन पारीतोषिके घोषित करण्यात आली आहेत. (Ganeshotsav)


राज्यातील विविध जिल्हयात गणेश मूर्ति कार्यशाळा, व्याख्यानमाला घरोघरीच्या बाप्पाची छायाचित्रे अपलोड करण्यासाठी स्वतंत्र पोर्टल. गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी कार्यशाळा उत्सवाचा इतिहास आणि सामाजिक भान, उत्सवाचे आर्थिक नियोजन. गणेश मूर्ति मोठी असो किंवा लहान भक्ति तेवढीच असते, ईश्वर मूर्तिच्या आकारावरून आशिर्वाद देत नाही. उत्सवात बीभस्त आणि अश्लिल गाणी लावण्या ऐवजी भजने, किर्तने, भक्तीगीते आणि जूनी अर्थपूर्ण भावगीते लावणे.



विकसीत भारताची पायाभरणी करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे येत्या १७सप्टेंबर २०२६ रोजी ७६ व्या वर्षीत पदार्पण करणार आहेत. या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात मुंबईसह महाराष्ट्रात गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरण असेल. पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वात मागील १२ वर्षात भारतात हिंदू धर्म, हिंदू सण उत्सवासाठी केंद्र सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. आयोध्येत भव्य राम मंदिराची उभारणी झाली. देशातील शेकडो तिर्थक्षेत्राचा विकास झाली. मोदीजींच्या नेतृत्वावर केवळ भारतातच नव्हे तर जगभरात हिंदू धर्माचा आणि संस्कृतिचा नव्याने जागर झाला. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हिंदू संस्कृति आणि उत्सव परंपरा विषयी निर्णय घेण्यात आले. सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार यांच्या पुढाकारातून तसेच पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नाने राज्य सरकारने गतवर्षी गणेशोत्सवाला राज्यमहोत्सवाचा दर्जा दिला या बद्दल अभिनंदन हिंदू संस्कृति सण परंपरेला सातत्याने प्रोत्साहन देणाऱ्या नेतृत्वाबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गणेश मंडळांनी एक दिवस गणरायाची विशेष महाआरतीचे आयोजन करावे. असे आवाहन अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाने केले आहे.(Ganeshotsav)

Comments
Add Comment

Mumbai Metro : गणेशोत्सवासाठी मुंबई मेट्रो सज्ज; १४ ते २५ सप्टेंबरपर्यंत वाढीव सेवा उपलब्ध

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रो वनने प्रवाशांसाठी विशेष सुविधा जाहीर केली आहे.

Ganpati Special Train : गणेशोत्सवासाठी रेल्वेचा मोठा दिलासा; ३८६ गणपती विशेष गाड्या जाहीर, कोकणासाठी ४ अतिरिक्त गाड्यांची भर

मुंबई :

Mumbai Water Update: मुंबईकरांचं पाण्याचं टेन्शन मिटलं! भातसा तलावात ९७.४० टक्के पाणीसाठा, सध्याची परिस्थिती काय?

मुंबई: मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सातही प्रमुख

Mumbai Accident News : शिवडी वर्कशॉपमध्ये भीषण अपघात; SUVच्या धडकेत ३२ वर्षीय कामगाराचा मृत्यू

मुंबई : शिवडीतील ‘कोलगेट जेटी’ परिसरातील एका ऑटोमोबाईल वर्कशॉपमध्ये एसयूव्हीच्या धडकेत ३२ वर्षीय कामगाराचा

Devendra Fadnavis : छत्रपतींचे अनुयायी हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत! मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईत धडकण्याच्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलनासाठी येण्याचा

Maharashtra Sea Development : सागरी विकासात महाराष्ट्र जगाचे नेतृत्व करणार!

- मंत्री नितेश राणेंचा उद्योग क्षेत्राला विश्वास; जहाजबांधणीपासून जलवाहतुकीपर्यंत गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र