बस स्थानकांमध्ये हिरकणी कक्षांची दुरवस्था

वाडा (वार्ताहर) : पालघर जिल्ह्यातील बस स्थानकांमध्ये हिरकणी कक्ष सध्या गायब झालेले दिसून येत आहेत. तर ज्या ठिकाणी हिरकणी कक्ष असल्याचे दिसून येतात त्यांची दुरवस्था झालेली दिसून येत आहे.


दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने हिरकणी कक्ष निर्माण करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची सर्वत्रच चांगली अंमलबजावणी झाली. ही सुविधा चार ते पाच वर्षे सुस्थितीत सुरू राहिली. त्यानंतर अनेक ठिकाणी पंखा, खिडक्यांना पडदे, तर काही ठिकाणी मातांना बसण्यासाठी खुर्चीच्या सुविधा हळूहळू गायब होत गेल्या. अलीकडेच हे कक्षच गायब झाले. डहाणू येथे असलेला हिरकणी कक्ष बस स्थानकात नसल्याने तो शोधून काढणे मातांसाठी कठीण जात आहे.


जव्हार बस स्थानकात हिरकणी कक्ष आहे मात्र या ठिकाणी सुविधांचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. बोईसर बस स्थानकात आजवर हिरकणी कक्ष उभारला गेलेला नाही. या ठिकाणी बस स्थानकाची पक्की इमारत नसल्याने हिरकणी कक्ष ठेवला गेलेला नसल्याचे समजते. वाडा बस स्थानकातील हिरकणी कक्ष गायब होऊन चार वर्षे झाली आहेत. जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या बस स्थानकात नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. या ठिकाणी हिरकणी कक्षाची नितांत आवश्यकता आहे. मात्र बस स्थानकात जागा अपुरी असल्याने हिरकणी कक्ष कुठे करायचा, हा प्रश्न येथील प्रशासनाला पडला आहे.

Comments
Add Comment

Instagram 90 minute video : युट्यूबला थेट टक्कर! इन्स्टाग्रामवर आता पाहता येणार ९० मिनिटांचे व्हिडीओ; नव्या 'फीचर्स'ची चाचणी सुरू

लॉस एंजिलीस : डिजिटल मनोरंजनाच्या जगात आपले स्थान अधिक मजबूत करण्यासाठी लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म

Nashik Kumbh Mela : 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण आणि गोदा आरतीसाठी नाशिक पोलिसांचा मूव्हमेंट प्लॅन जाहीर ! बंद राहणारे रस्ते आणि पार्किंगची ठिकाणे जाणून घ्या

[caption id="attachment_1069583" align="aligncenter" width="800"] नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७ च्या ३१ ऑक्टोबर २०२६, शनिवार रोजी

CET परीक्षेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; विद्यार्थ्यांना मिळणार दोन संधी

तांत्रिक, व्यावसायिक, वैद्यकीय आणि इतर उच्च शिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्यस्तरीय सामायिक प्रवेश

PM Narendra Modi Prince Alois : भारत-लिश्टनस्टाइन संबंधांमध्ये नवा अध्याय! पंतप्रधान मोदींची युवराज अलोइस यांच्याशी हैदराबाद हाऊसमध्ये महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा

नवी दिल्ली : लिश्टनस्टाइनचे युवराज अलोइस (Hereditary Prince Alois) आणि त्यांच्या पत्नी राजकुमारी सोफी सध्या भारताच्या अधिकृत

IND vs NZ, 3rd T20: नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने, श्रेयस अय्यर गोलंदाजी घेत प्लेइंग 11 बाबत म्हणाला..

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल पुन्हा एकदा

Thane Metro Update : गायमुख ते कासारवडवली मेट्रो दिवाळीत सुरू होणार

मुंबई : घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या ठाणेकरांना दिवाळीत मेट्रोची भेट मिळणार आहे. गायमुख ते