वाढदिवसाच्या निमित्ताने अण्णा हजारेंचा एकनाथ शिंदेंना फोन, केले सरकारच्या कामाचे कौतुक

राळेगणसिद्धी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जाऊन भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. राज्यातील इतर राजकीय नेत्यांनी व सर्व स्तरांतून देखील एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही मुख्यमंत्री शिंदेंना फोनवरुन शुभेच्छा दिल्या. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या कामाचे कौतुक केले.


'तुमच्या कामाच्या बातम्या वाचतो, चांगले काम करत आहात. असेच काम पुढे सुरू ठेवा. आमचा आशिर्वाद चांगले काम करणाऱ्या लोकांच्या पाठीमागे कायम आहे, असे कौतुक अण्णा हजारे यांनी केले.


'तळागाळातून परिवर्तन होणे गरजेचे होते. तुमची जोडी चांगली काम करते. ही जोडी महाराष्ट्राला चांगली मिळाली आहे. तुमचा महाराष्ट्रासाठी एक-एक क्षण महत्वाचा आहे. तो क्षण तुम्ही राज्याच्या समाजकारणासाठी लावा, असेही अण्णा हजारे म्हणाले.

Comments
Add Comment

Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर! अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा

महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा जोर पकडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी

Nanded Road Accident : नांदेड-भोकर मार्गावर भीषण अपघात! ट्रक-टाटा मॅजिकची जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू, ८ गंभीर

नांदेड : नांदेडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नांदेड-भोकर मार्गावर ट्रक आणि टाटा मॅजिक प्रवासी व्हॅनचा

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने 'मोदी एक्सप्रेस' आज रवाना होणार

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी अत्यंत लोकप्रिय ठरलेली 'मोदी एक्सप्रेस' शुक्रवारी

Jalna Kunbi Certificate : जालना जिल्ह्यात १८ हजार २७६ कुणबी जात प्रमाणपत्रांचे वितरण; ९९.९ टक्के अर्ज मंजूर झाल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

जालना : मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आणि कुणबी जात प्रमाणपत्र वितर

Maharashtra ports development : राज्यातील बंदरे आणि जलवाहतुकीला 'अर्थबळ' - १७० कोटींचा निधी मंजूर!

रस्ते, जेट्टी, पोहोचरस्ते आणि प्रवासी सुविधांच्या १०४ कामांना मंजुरी मुंबई : महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील

Dhule : धुळ्यात बिबट्याचा थरार ! अंगणातून दोन वर्षीय चिमुकल्याला उचललं अन्.... हृदयद्रावक घटना

Dhule : शिरपूर तालुक्यातील अर्थे (बु.) शिवारात बिबट्याने दोन वर्षीय चिमुकल्यावर हल्ला करून त्याला जबड्यात पकडून