शिर्डीत सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना उलट्या आणि जुलाब

शिर्डी : अमरावतीहून शिर्डीला सहलीसाठी आलेल्या ८२ विद्यार्थ्यांसह ६ शिक्षकांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील आदर्श हायस्कूलमधील हे विद्यार्थी असून दोन दिवसांपूर्वी ते सहलीसाठी निघाले होते. शिर्डीत येण्यापूर्वी त्यांनी शेवगावजवळ दुपारचे जेवण केले आणि त्यानंतर शिर्डीत आल्यानंतर त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले. मात्र रात्री परतीच्या मार्गावर निघाले असताना विद्यार्थी आणि काही शिक्षकांना उलट्या आणि जुलाब सुरू झाले.


विद्यार्थांना अधिक त्रास जाणवत असल्याने शिक्षकांनी सर्व मुलांना रात्री शिर्डीच्या साईनाथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आता सर्वांची प्रकृती ठिक असली तरी यातील काहींना तापही येऊ लागल्याने खबरदारी म्हणून रुग्णालयाने सर्व विद्यार्थांना देखरेखीखाली ठेवले आहे.


विशेष म्हणजे या मुलांनी बाहेर कुठे काही खाल्ले नसल्याचे शिक्षकांनी सांगितले. जेवण तयार करण्याची सामुग्रीही सोबतच असल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात आले. त्यामुळे सततचा प्रवास आणि पाण्यात बदल झाल्यामुळे उलट्या आणि जुलाब सुरू झाले असावेत, असा अंदाज डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात आला आहे.


अमरावतीहून सहलीसाठी एकूण २२७ विद्यार्थी आले असून यातील ८२ विद्यार्थ्यांना त्रास झाला. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून साईनाथ रुग्णालयाचे सर्व डॉक्टर आणि कर्मचारी विद्यार्थ्यांची काळजी घेत आहेत. परिस्थितीनुसार सायंकाळी विद्यार्थी आणि शिक्षकांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती साईनाथ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

Comments
Add Comment

Maharashtra Noise Pollution : धार्मिक मिरवणुकांतील आवाजावर हायकोर्टाची नजर, कायद्याच्या अंमलबजावणीचा मागवला अहवाल

Maharashtra Noise Pollution : धार्मिक मिरवणुका आणि उत्सवांदरम्यान होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावर मुंबई उच्च

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांची आयकर विभागाकडून चौकशी

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाशी संबंधित काही नेते, त्यांचे नातेवाईक आणि व्यावसायिक सहकाऱ्यांच्या आर्थिक

  Maharashtra Weather : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम; 22 सप्टेंबरला अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा, कुठे बरसणार जोरदार सरी?

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांत पावसाच्या सरी सुरू आहेत. मान्सूनच्या परतीला सुरुवात झाली

Ketan Aggarwal Murder : प्लीज! त्याची हत्या करू नका..' केतनच्या हत्येआधी नक्की काय घडलं? 2 साक्षीदाराने सगळंचं सांगितलं

पुणे :  पुण्यातील लोहगड परिसरात झालेल्या केतन अग्रवाल हत्याप्रकरणात पोलिसांच्या तपासातून आणखी काही महत्त्वाची

Chandrashekhar Bawankule News: महसुलमंत्र्यांचा 'आदर्श नोंदणी पॅटर्न' आता देशभरात, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे केंद्रीय सचिवांकडून कौतुक

मुंबई: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून अस्तित्वात आलेल्या मॉडेल नोंदणी कार्यालयांच्या

Sindhudurg News: सिंधुदुर्गात ऑनलाइन गेमिंग, मटक्याविरोधात विशेष यंत्रणा, मंत्री नितेश राणे यांची माहिती

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑनलाइन गेमिंग, ऑनलाइन मटका आणि जुगाराच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी