सिंधुदुर्ग : राज्यातील काही भागात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय विभागाशी ...
ओरोस येथे माध्यमांशी संवाद साधताना राणे म्हणाले की, सिंधुदुर्गातील ऑनलाइन गेमिंग आणि सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या प्रकारांच्या पार्श्वभूमीवर विशेष आढावा घेण्यात आला. पोलिसांच्या कारवाईमुळे मटका आणि जुगाराची अनेक केंद्रे बंद झाली असली तरी ऑनलाइन माध्यमातून सुरू असलेल्या प्रकारांवरही आता लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्हा गोव्याच्या सीमेला लागून असल्याने ऑनलाइन मटका आणि गेमिंगसारख्या प्रकारांचा धोका अधिक असल्याचे राणे यांनी नमूद केले. तरुण-तरुणींना अशा चुकीच्या सवयींच्या सापळ्यात अडकण्यापासून रोखण्यासाठी जिल्ह्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कशी उभारता येईल, तसेच राज्याच्या गृह विभागाकडून जिल्ह्याला अधिक बळ कसे मिळवून देता येईल, याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील प्रवासी आणि रिक्षाचालकांमधील संघर्ष, भाड्याबाबतची अनिश्चितता आणि रिक्षांच्या रांगांमुळे होणारी गैरसोय दूर ...
ऑनलाइन माध्यमातून घडणाऱ्या गुन्ह्यांचे ‘डिटेक्शन’ कसे वाढविता येईल आणि हे गुन्हे का व कशा पद्धतीने घडत आहेत, याबाबत पोलीस अधीक्षकांनी बैठकीत माहिती दिली. त्यानुसार पुढील काळात आवश्यक कारवाई करण्यात येणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. या कामासाठी अतिरिक्त मनुष्यबळ किंवा स्वतंत्र पथकाची आवश्यकता असल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सिंधुदुर्गला विशेष प्रकरण म्हणून अतिरिक्त पथक उपलब्ध करून देण्याबाबतही विचार करण्यात येत असल्याचे राणे यांनी सांगितले.