रमेश बैस महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल

मुंबई : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांनी आज राज्यपालपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये शपथविधीचा सोहळा पार पडला. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला यांनी बैस यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. रमेश बैस यांनी मराठीतून राज्यपालपदाची शपथ घेतली.


यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


यावेळी राजभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


रमेश बैस यांचा जन्म २ ऑगस्ट १९४७ रोजी मध्य प्रदेशातील रायपूरमध्ये झाला आहे. आता ते रायपूर छत्तीसगडमध्ये आहे. रमेश बैस यांची जुलै २०२१ मध्ये झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले होते. याआधी जुलै २०१९ ते २०२१ पर्यंत त्रिपुराचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिले. २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा सत्तेत आले होते तेव्हा त्यांना त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मध्य प्रदेश भाजपचे ते उपाध्यक्ष होते.

Comments
Add Comment

Ganpati Idol News: दीड दिवसाच्या गणपतीला आज निरोप, ढोल ताशाच्या गजरात साश्रुनयनांनी गणेश मुर्तींचे विसर्जन

मुंबई: "गणपती बाप्पा मोरया, मंगल मुर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" या जयघोषात साश्रुनयनांनी मुंबई आणि

Lalbaugcha Raja Update : 'लालबागच्या राजा'च्या दरबारी मीडियाची कोंडी! अधिकृत पास असूनही पोलिसांनी अडवल्याने पत्रकार आक्रमक

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध 'लालबागच्या राजा'च्या (Lalbuagcha Raja 2026) दर्शनासाठी गणेशोत्सवादरम्यान (Ganeshotsav 2026) दरवर्षी लाखो

US Ambassador Sergio Gor : 'लालबागच्या राजा'च्या दरबारी अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर; दर्शन घेत म्हणाले, "येथील ऊर्जा आणि उत्साह अद्भुत!"

मुंबई : गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर भारतातील अमेरिकेचे राजदूत (Ambassador of the United States of America ) सर्जिओ गोर (Sergio Gor) यांनी मुंबईतील

Police Rescue : विरारमध्ये पोलिसांच्या तत्परतेने टळला अनर्थ; आर्थिक विवंचनेतून चिमुकल्या मुलींसह आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कुटुंबाचे वाचले प्राण

विरार: आर्थिक विवंचना, कौटुंबिक तण

Parag Shah : ३,३८३ कोटींच्या मालमत्तेचे मालक असलेले भाजप आमदार पराग शाह घाटकोपरमध्ये झाले एका दिवसासाठी 'भिकारी'; नेमका प्रयोग कशासाठी?

मुंबई:

Amit Shah Ganpati Darshan : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले सहकुटुंब 'लालबागच्या राजा'चे दर्शन; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची विशेष उपस्थिती