पुन्हा अवकाळीचा इशारा! शेतक-याने जगायचे कसे?

मुंबई : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळीचे ढग असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शुक्रवार २४ मार्चपासून राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या महिन्यात दोन वेळा आलेल्या अवकाळीतून शेतकरी अद्याप सावरलेला नाही. त्यातच पुन्हा अवकाळीचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून शेतक-याने जगायचे कसे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


मुंबईत पुढील तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. समुद्राकडून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांमुळे पाऊस कोसळत आहे. पुढील ४८ तासात उत्तर महाराष्ट्र, दक्षिण कोकणात विजांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. त्याशिवाय पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील तापमानात दोन ते तीन अंशांची घट बघायला मिळेल, असे मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख सुनिल कांबळे यांनी सांगितले.


तसेच २४ मार्चनंतर महाराष्ट्रात पुन्हा काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुन्हा अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर अतोनात नुकसान झाले आहे. विदर्भ, मराठवाडा अन् उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे पिकांची नासाडी झाली. कोकणात आंबा-काजूचा मोहोर गळून पडला. यातून शेतकरी अद्याप सावरलेला नाही. राज्यात अनेक ठिकाणी उभी पिके पाण्यात गेल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. सरकारकडून मदतीची घोषणा झाली पण अनेक ठिकाणी बांधावर अधिकारी पोहचले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे आधीच अडचणीत सापडलेला शेतकरी आणखी संकटात जाण्याची शक्यता आहे.


दरम्यान, या पावसामुळे अचानक झालेल्या वातावरण बदलांमुळे मानवी आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक ठिकाणी सर्दी, खोकल्यांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. बदलत्या हवामानामुळे आजारांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पावसाने घेतली उघडीप; 4 ऑक्टोबरला राज्यात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज

मुंबई : सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने अनेक भागांत पावसाची प्रतीक्षा

Maharashtra FDA raids : ठाणे-पालघरमध्ये FDA ची मोठी कारवाई; पान मसाला आणि तंबाखूसह 2.69 कोटींचा माल जप्त

ठाणे : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मोठी कारवाई करत प्रतिबंधित पान मसाला, सुगंधी

Chandrashekhar Bawankule News: महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरच घेतला चटणी भाकरीचा आस्वाद

अकोला: महाराष्ट्रातील अनेक जिल्हे आज दुष्काळाच्या सावटाखाली आहेत. राज्यामध्ये पडलेल्या दुष्काळाचा पाहणीदौरा

आंबा-काजू उत्पादकांसाठी एआय आधारित ‘स्मार्ट शेती’ प्रकल्प - मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई : बदलत्या हवामानाचा आंबा आणि काजू पिकांना बसणारा फटका कमी करण्यासाठी सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना आता

ते तीन जण किल्ल्यावर अडकले, दगडफेक केली; अखेर बचाव पथकाने सुरक्षितपणे बाहेर काढले

पुण्यातील मावळ तालुक्यातील तिकोना किल्ल्यावर अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यात यश आले आहे. रात्री उशिरा केलेल्या

मराठीला स्वाभिमान आणि भावनेपुरते मर्यादीत न ठेवता ज्ञान भाषा बनविणे आवश्यक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मराठी भाषा फक्त स्वाभिमान आणि भावनेचा विषय न राहता ज्ञानाची भाषा बनवायची असेल, तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या