Chandrashekhar Bawankule News: महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरच घेतला चटणी भाकरीचा आस्वाद

अकोला: महाराष्ट्रातील अनेक जिल्हे आज दुष्काळाच्या सावटाखाली आहेत. राज्यामध्ये पडलेल्या दुष्काळाचा पाहणीदौरा सध्या राज्यातील मंत्र्यांकडून केला जात आहे. आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अकोला जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. पाहणीदौऱ्यावेळी महसुल मंत्र्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावरच पिठलं भाकरीचा आस्वाद घेतला. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील मानकी देगाव येथे शेताची पाहणी करताना महसुल मंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत पिठलं भाकरी खाल्ली. यावेळी महसुल मंत्र्यांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे सुद्धा त्यांनी यावेळी आश्वासन दिले.



निसर्गाच्या अवकृपेमुळे कोमेजलेल्या पिकांचे दुःख आणि उन्हाच्या झळांनी पोळलेल्या शेतकर्‍याचे अश्रू पुसण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ आपआपल्या जिल्ह्यात थेट बांधावर उतरले आहे. दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील मानकी देगाव येथे शेताची पाहणी करताना महसुल मंत्र्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर पिठलं भाकरीचा आस्वाद घेतला. या आगळ्यावेगळ्या आणि अत्यंत भावनिक प्रसंगाचे साक्षीदार संपूर्ण शिवारातील जनता होती. सामान्य शेतकऱ्यासोबत शेतातील झाडाच्या सावलीत बसून महसुल मंत्र्यांनी पंगतीचा आनंद घेतला, तेव्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यांत केवळ दुःखच नाही, तर आशेचा एक नवा किरण चमकताना दिसला.



दुष्काळदौऱ्यावेळी महसुल मंत्र्यांनी अकोल्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये अनेक शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारली. यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या समस्या, शेतीचे प्रश्न, सावकारी आणि कर्ज यासह वेगवेगळे प्रश्नांची त्यांनी निवेदनं स्विकारली. शेतकऱ्यांच्या बांधासोबतच शासकीय विश्रामगृहामध्येही अनेक शेतकऱ्यांनी आपल्या समस्येचा महसुल मंत्र्यांसमोर पाढा वाचला. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनेक प्रश्न तिथल्या तिथेच मार्गी लावले तर, काही प्रश्नांसंबंधित नागरिकांना आश्वासन दिले. गेल्या आठवड्यामध्येच सरकारने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. तब्बल 265 तालुक्यांमध्ये सरकारने दुष्काळ जाहीर केला. त्यामुळे शेतकऱ्यांसह त्यांच्या मुलांनाही काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. शाळा- महाविद्यालयाची फी, शैक्षणिक कर्ज सुद्धा काही प्रमाणात माफ करण्यात आलं आहे.

Comments
Add Comment

आंबा-काजू उत्पादकांसाठी एआय आधारित ‘स्मार्ट शेती’ प्रकल्प - मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई : बदलत्या हवामानाचा आंबा आणि काजू पिकांना बसणारा फटका कमी करण्यासाठी सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना आता

ते तीन जण किल्ल्यावर अडकले, दगडफेक केली; अखेर बचाव पथकाने सुरक्षितपणे बाहेर काढले

पुण्यातील मावळ तालुक्यातील तिकोना किल्ल्यावर अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यात यश आले आहे. रात्री उशिरा केलेल्या

मराठीला स्वाभिमान आणि भावनेपुरते मर्यादीत न ठेवता ज्ञान भाषा बनविणे आवश्यक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मराठी भाषा फक्त स्वाभिमान आणि भावनेचा विषय न राहता ज्ञानाची भाषा बनवायची असेल, तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या

Pankaj Bhoyar : सीजेपीच्या आंदोलनात असामाजिक घटकांची घुसखोरी ?

- संशयितांचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध सुरू; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती मुंबई : मुख्य निवडणूक

पाऊस संपला, उकाडा वाढणार! मुंबईतून नैऋत्य मोसमी पाऊस माघारी; IMD ची घोषणा

यंदा अत्यल्प पावसामुळे उकाडा आणि गर्मीने नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. अशातच आज (३ ऑक्टोबर २०२६) भारतीय हवामान

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘डीपीसी’चा निधी गोठवला; रस्ते, पायाभूत सुविधांच्या कामांना ब्रेक

जलसंधारण, टँकर आणि चारा छावण्यांसाठी निधी वळवणार मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर