डबेवाले जाणार सुट्टीवर, मुंबईकरांची होणार गैरसोय...आता पुढे काय?

मुंबई: शहरातील प्रसिद्ध डबेवाले गावातील वार्षिक जत्रोत्सवासाठी ३ एप्रिल ते ८ एप्रिल दरम्यान रजेवर जाणार आहेत. मुंबई डबावाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी ही माहिती दिली. त्यामुळे सहा दिवस मुंबईतील हजारो कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरी शिजवलेले ताजे अन्न मिळणार नाही.


याबाबत अधिक माहिती देताना सुभाष तळेकर म्हणाले, डबेवाले त्यांचे दैवत खंडोबाचा उत्सव साजरा करण्यासाठी तसेच तसेच ३ ते ८ एप्रिल दरम्यान त्यांच्या गावांतील ग्रामदेवतांच्या यात्रांसाठी आपापल्या गावी जाणार आहेत. रविवारी ९ एप्रिल रोजी मुंबईला ते परत येतील आणि सोमवारपासून ग्राहकांना गरमागरम खाद्यपदार्थांनी भरलेले डबे पोहोचवण्यासाठी पुन्हा कामाला लागतील.


बहुसंख्य डबेवाले हे खेड, अकोला, संगमनेर, जुन्नर, मावळ आणि मुळशी या गावांतील असून उरलेले उर्वरित महाराष्ट्रात विखुरलेले आहेत.


तळेकर यांनी या रजेबाबतची माहिती ग्राहकांना आधीच दिल्याचे सांगितले. ते म्हणाले, "आम्ही आमच्या ग्राहकांना आधीच माहिती दिली होती. मात्र, या सहा दिवसांच्या सुट्यांमध्ये महावीर जयंती आणि गुड फ्रायडे या दोन सरकारी सुट्ट्यांचा समावेश आहे."


दरम्यान, डबेवाल्यांच्या या सुट्टीमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल डबेवाला संघटनेने दिलगिरी व्यक्त केली असून ग्राहकांना विनंती केली आहे की त्यांनी डब्बेवाल्यांचे पैसे कापू नयेत.

Comments
Add Comment

Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत पावसाची हजेरी! हलका-मध्यम पाऊस, वाऱ्याचा जोर; IMDचा शहराला मोठा अलर्ट नाही

मुंबई : गणरायाच्या आगमनाने मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच शहरात पावसानेही हजेरी लावली आहे.

Navi Mumbai Crime: टिंडर ॲपवरून मैत्री, बिअर पाजली, हॉटेलला बोलवून... मुंबईतील धक्कादायक घटना

नवी मुंबई: पुन्हा एकदा मुंबईमध्ये डेटिंग ॲपवरून तरूणींची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. हा संपूर्ण

Nitesh Rane News: हिंदू भूमीच्या रक्षणासाठी वराह देवाचे स्मरण आवश्यक, मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन

मुंबई: हिंदू भूमीकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांपासून तिचे रक्षण करण्यासाठी वराह देवाचे स्मरण आणि पूजन आवश्यक

Central Railway : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत! कल्याणमध्ये ओव्हरहेड वायर बिघाडामुळे प्रवाशांचा खोळंबा

मुंबई : मध्य रेल्वेच्या मार्गावरील लोकल सेवा तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाली आहे. कल्याण रेल्वे स्थानकाजवळ

Mumbai Municipal Corporation : जाहिराती प्रदर्शित करून रस्ते, पदपथ अडवू नका!

पादचारी प्रथम अभियानाला सहकार्य करण्याचे महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे आवाहन श्रीगणेशोत्सव व

BMC Ganeshotsav : यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ८५ कृत्रिम तलावांत वाढ, गणेश भक्तांनी बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे; महापालिका प्रशासनाने केले आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने यंदाच्या गणेशोत्सवामध्ये बाप्पांच्या मूर्ती विसर्जन