Mumbai Municipal Corporation : जाहिराती प्रदर्शित करून रस्ते, पदपथ अडवू नका!

पादचारी प्रथम अभियानाला सहकार्य करण्याचे महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे आवाहन


श्रीगणेशोत्सव व नवरात्रौत्सवादरम्यान व्यावसायिक जाहिरातींच्या प्रदर्शनासाठी महानगरपालिकेकडून नियम जारी


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : श्रीगणेशोत्सव कालावधीत बृहन्मुंबईत गणेश भक्तांचा मोठा ओघ असतो. नागरिक मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी होतात. श्रीगणेश दर्शनासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना पायी मार्गक्रमण करणे सुलभ असायला हवे. त्यामुळे, या कालावधीत पादचाऱ्यांना मार्गक्रमण करताना अडथळा निर्माण होईल, अशाप्रकारे रस्ते आणि पदपथांवर जाहिराती प्रदर्शित करू नयेत. ’पादचारी प्रथम ’ अभियानासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना आणि हे अभियान मुंबईत मोठ्या स्वरूपात प्रभावी पध्दतीने राबविण्यात येत आहे. या अभियानाला नागरिकांचा मोठा सहभाग लाभत आहे. या अभियानाची सर्वत्र प्रशंसा केली जात आहे. यासाठी उत्सव-सणानिमित्त नागरिक आणि इतर सर्व घटकांनी सहकार्य करावे. रस्ते, पदपथांवर अनधिकृतपणे जाहिराती लावू नयेत आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी केले आहे. (Mumbai Municipal Corporation)


मुंबईतील श्रीगणेशोत्सव अधिकाधिक सेवा सुविधांयुक्त असावा, या अनुषंगाने, महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर, श्रीगणेशोत्सव व नवरात्रौत्सवादरम्यान व्यावसायिक जाहिरातींच्या प्रदर्शनासाठी नियम निश्चित करण्यात आले आहेत. (Mumbai Municipal Corporation)



महानगरपालिका प्रशासन आणि परवाना विभागाने (लायसन्स) या नियमांचे पालन करून अडथळे ठरणारे जाहिरात फलक त्वरित काढून टाकण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त भिडे यांनी दिले आहेत.



जाहिरातींसंदर्भात प्रमुख नियम


-श्रीगणेशोत्सव व नवरात्रौत्सव मंडळांनी गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ, इतर प्रतिबंधित उत्पादनांच्या जाहिराती प्रदर्शित करणे प्रकर्षाने टाळावे.


-जाहिराती प्रदर्शित करताना पदपथावरील पादचाऱ्यांना तसेच रस्त्यावरील वाहतुकीला कुठल्याही प्रकारे अडथळा होणार नाही, याची दक्षता घ्यावी.


- मंडळाच्या पारंपरिक प्रवेशद्वाराच्या वरच्या आडव्या बाजूवर मंडळास 'भक्तांचे हार्दिक स्वागत' संदेश लावता येईल. प्रवेशद्वाराच्या उजव्या व डाव्या उभ्या बाजूवर देणगीदारांची व्यावसायिक जाहिरात प्रदर्शित करता येईल.


-सामाजिक व नागरी संदेश प्रदर्शित करून नागरिकांमध्ये जनजागृती करावी.


-श्रीगणेशोत्सव व नवरात्रौत्सव मंडळांना डिजिटल माध्यमातून जनहिताचे/आरोग्यविषयक संदेश तसेच व्यावसायिक जाहिरात प्रदर्शित करण्याकरिता १० बाय १०' मर्यादेपर्यंतच्या आकारमानाचे डिजिटल स्क्रिन वाहतूक विभागाचे व स्थानिक पोलिस ठाण्याचे ना-हरकत प्रमाणपत्र घेण्यासापेक्ष लावण्याकरिता परवानगी देण्यात येईल. (Mumbai Municipal Corporation)



विसर्जनानंतरही नियम लागू


सार्वजनिक श्रीगणेशोत्सव व नवरात्रौत्सवाच्या कालावधीत तसेच विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी सदर जाहिरात फलक संबंधित मंडळांनी स्वतः पुढाकार घेऊन काढून टाकावे. सार्वजनिक उत्सवाचा धार्मिक व सामाजिक आशय कायम राखत जाहिरात प्रदर्शन शिस्तबद्ध पद्धतीने करावे आणि निश्चित केलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन देखील महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी केले आहे. (Mumbai Municipal Corporation)

Comments
Add Comment

BMC Ganeshotsav : यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ८५ कृत्रिम तलावांत वाढ, गणेश भक्तांनी बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे; महापालिका प्रशासनाने केले आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने यंदाच्या गणेशोत्सवामध्ये बाप्पांच्या मूर्ती विसर्जन

Mirzapur The Movie : ‘मिर्झापूर: द मुव्ही’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! नवव्या दिवशी कमाईत ४२% वाढ, जगभरात २४६ कोटींचा टप्पा पार

मुंबई : ‘मिर्झापूर: द मुव्ही’ची बॉक्स ऑफिसवरील दमदार कामगिरी दुसऱ्या आठवड्यातही कायम आहे. ४ सप्टेंबरला

Ganeshotsav 2026 : बाप्पांचे आगमन आणि विसर्जन मार्गावरील दहा पुलांवर यंदाही घ्यावी लागणार काळजी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : श्री गणरायांच्या आगमन आणि विसर्जन मार्गावर येणाऱ्या शहरातील दहा प्रमुख पुलांवर यंदाही

Ganeshotsav Mumbai : मुंबईकरांनो, लाडक्या बाप्पासाठी मागवा घरपोच मोदकाचा नैवेद्य; महानगरपालिकेच्यावतीने श्रीगणेशोत्सवासाठी ‘मोदक महोत्सव २०२६’

महिला बचत गटांच्या माध्यमातून १४ सप्टेंबर २०२६ पासून घरपोच मिळणार मोदक मुंबई (विशेष प्रतिनिधी) : श्री गणरायांचे

Sound Pollution : ध्वनी हा उत्सवाचा भाग असला तरीही. संयम हीच संस्कृती

आगमन, विसर्जन मार्गात वाहतूक नियमांचे पालन करा बृहन्मुंबई सार्वजनिक उत्सव समन्वय समितीने केले आवाहन मुंबई

Mumbai Coastal Road : जानेवारी २०२९मध्ये मुंबईकरांना विस्तारीत कोस्टल रोडवरून प्रवास करता येणार

डिसेंबर २०२८ पर्यंत प्रकल्प काम पूर्ण करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई