वैशाखरे नदीवरील पुलाचे फोटो व्हायरल, कारण... 'भारतीय टेक्नॉलॉजीची' किमया

मुरबाड: बातमीतील फोटो पाहिला की तुमच्या लक्षा येईल की कल्याण - माळशेज महामार्गतील वैशाखरे नदीवरील पुलाकडे प्रशासनाचे किती लक्ष आहे. शेवटच्या घटका मोजत असलेला हा पूल जिवंत ठेवण्यासाठी चक्क 'होम मिनिस्टर' तेलाच्या रिकाम्या डब्यांमध्ये माती भरून त्यात बांबू रोवून त्या बांबूना रिबीन बांधण्यात आल्या आहेत. पुलाची ही दुरवस्था पाहता महाड येथील सावित्री नदीवरील झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.


या पुलावर रात्रंदिवस हजारों वहानांची वर्दळ असते. रात्रीच्या वेळी वहाने खड्ड्यांमध्ये आदळुन पुलाचा कठडा तोडून खाली कोसळतात. असे अपघात सातत्याने घडत असुन वहान चालकांना खड्डे चुकवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.


दरम्यान, बांधकाम खात्याच्या या नावीण्यपूर्ण खास भारतीय टेक्नॉलॉजीचा माळशेज मार्गे जाणारे येणारे पर्यटक फोटो काढून आपल्या नातेवाईकांना तसेच देशविदेशातील, मित्रमैत्रिणींना पाठवत असल्याचे काहींनी सांगितले. अंदाजे १९७५ साली बांधण्यात आलेला पुल पुर्णपणे जीर्ण व नादुरुस्त झाला असुन शासनाने वेळीच दखल घेतली नाही तर भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Short Circuit : लालबागच्या राजाच्या मंडपात मुखदर्शनाच्या रांगेत शॉर्टसर्किट; भाविकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण   

Ramesh Pawar : मनात कलेचा ध्यास, हातात सर्जनशीलता अन् हृदयात श्रद्धा; रमेश पवारांच्या घरात साकारलं त्र्यंबकेश्वर मंदिर!

नाशिक : परिस्थिती कितीही साधी असली, तरी मनात काहीतरी करण्याची जिद्द आणि नवी कल्पना साकारण्याची इच्छा असेल, तर

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकच्या ब्रँडिंगसाठी व्यापक आराखडा तयार करावा-प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

नाशिक : आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिकची धार्मिक, सांस्कृतिक आणि

Nashik : सिंहस्थ महाकुंभ गणेश मंडळ स्पर्धा : ४२ गणेश मंडळांचा सहभाग, आता देखाव्यांची प्रत्यक्ष पाहणी

Nashik : सिंहस्थ महाकुंभ मेळा २०२७च्या जनजागृतीसाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने आयोजित केलेल्या

Radha Ashtami : सुख, शांती आणि समृद्धीसाठी राधा अष्टमीची पूजा कशी करावी? वाचा टप्प्याटप्प्याने संपूर्ण विधी

राधाष्टमीनिमित्त बरसाणामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे. शनिवारी वृषभानू नंदिनी राधाराणी यांची जयंती

Nashik Ashram School News : आश्रमशाळेची दुरवस्था पाहून मंत्री संतप्त, मान्यता रद्द करण्याच्या सूचना

Nashik Ashram School News : आश्रमशाळांमधील सुविधांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके