पंजाबविरुद्ध राजस्थान ठरणार किंग्ज?

गुवाहाटी : इंडियन प्रीमियर लीगचा आठवा सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात बुधवारी गुवाहाटी येथील बारसापारा स्टेडियमवर होणार आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या पंजाबने आपल्या पहिल्याच सामन्यात केकेआरला पराभूत केले, तर संजू सॅमसनच्या कर्णधारपदाखाली खेळत असलेल्या राजस्थानने हैदराबाद संघाला तब्बल ७२ धावांनी पराभूत केले आहे. राजस्थान रॉयल्सचा फलंदाजी आणि गोलंदाजी विभाग पाहता त्यांच्यात कोणत्याही संघाला धूळ चारण्याची क्षमता आहे. त्यामुळे रॉयल्स विरुद्ध पंजाब या सामन्यात कोणता संघ 'किंग्ज' ठरणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.



आयपीएल २०२३ वेळापत्रक आणि बातमी एका क्लिकवर…


पंजाब किंग्जसाठी भारताचा अव्वल फळीतील फलंदाज शिखर धवनचा अनुभव उपयोगी पडेल. तसेच पंजाबचा संघ सलामीवीर म्हणून इंग्लंडचा पॉवर हिटर लियाम लिव्हिंगस्टोनच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहे. आयपीएलच्या इतिहासातील महागडा खेळाडू सॅम करन, डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, रबाडा हे गोलंदाज पंजाबचे ट्रम्प कार्ड ठरू शकतात. पंजाब किंग्ज संघात कर्णधार शिखर धवन, भानुका राजपक्षे, सिकंदर रझा यांच्यावर फलंदाजीची भिस्त असेल. गत सामन्यात केकेआरविरुद्ध अर्शदीपने चेंडूने, तर राजपक्षे आणि धवनने बॅटने कमाल दाखवली आहे. त्यामुळे पंजाबचा संघ तुलनेने अधिक संतुलित दिसत असलेल्या राजस्थान रॉयल्स समोर आव्हान उभे करू शकतो.



हे पण वाचा : क्रिकेट समालोचक आकाश चोप्रा कोरोना पॉझिटीव्ह!


दुसरीकडे रॉयल्सची फलंदाजी खोलपर्यंत आहे. कोणत्याही गोलंदाजी आक्रमणाला तोंड देण्याची क्षमता या संघात आहे.  युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने गत सामन्यात ३७ चेंडूंत ५४ धावा तडकावत तो सलामीवीर म्हणून परिपक्व झाला आहे हे दाखवून दिले. बटलरने अवघ्या २० चेंडूंत अर्धशतक झळकावताना गत सामन्यात २२ चेंडूंत ५४ धावा केल्या. यशस्वी जयस्वाल, इंग्लंडचा एकदिवसीय कर्णधार धडाकेबाज फलंदाज जोस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसन यांनी एसआरएच विरुद्ध अर्धशतके झळकावली, तर युझवेंद्र चहल (१७ /४) आणि वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट (२१/२) यांनी आपल्या धारदार गोलंदाजीने हैदराबादला हैराण केले.  त्यामुळे गोलंदाजी विभागात गोलंदाज चहल आणि आर अश्विन या दोन भारतीय दिग्गजांसह जगातील प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेला न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट या बॉलिंग लाइनअपच्या साथीने रॉयल्स सर्वात तगडी फलंदाजी बाजू असलेल्या संघाला सुद्धा नामोहरम करू शकतात. मागील सामन्यांतून एकमेव कमकुवत दुवा, जर शोधायचा झालाच तर ती त्यांची मधली फळी, जे देवदत्त पडिक्कल आणि रियान पराग दोघेही स्वस्तात बाद झाले. असे असले तरी राजस्थान सध्याचा सर्वात संतुलित संघ दिसत आहे.


गुवाहाटीतील बारसापारा स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी फायदेशीर आहे. या खेळपट्टीवर चेंडू बॅटवर बाऊन्ससह चांगला येतो आणि फलंदाज जमिनीलगत भरपूर चौकार आणि षटकार मारताना दिसतात. येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ३, तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने २ सामने जिंकले आहेत. खेळपट्टीची सर्वोच्च धावसंख्या २३७ आणि सर्वात कमी धावसंख्या ११८ अशी आहे. या मैदानावर पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या १४९ आणि दुसऱ्या डावाची सरासरी धावसंख्या १३८ आहे.


ठिकाण : बारसापारा स्टेडियम, गुवाहाटी


वेळ : सायं. ७.३०

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून