आंबा महाग आहे, चिंता नको; आधी खा, नंतर पैसे द्या!

पुणे : देशात फळांच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकाने हापूस आंब्याची विक्री वाढवण्याचा अभिनव मार्ग शोधला आहे. पुण्यातील एक व्यापारी अल्फोन्सो आंबा चक्क मासिक हप्त्यावर (ईएमआय) विक्री करत आहे. आंब्याच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन व्यापाऱ्याने हे पाऊल उचलले आहे.


गुरुकृपा ट्रेडर्स अँड फ्रूट प्रॉडक्ट्सचे गौरव सणस यांनी सांगितले की, हंगामाच्या सुरुवातीला आंब्याचे दर नेहमीच जास्त असतात. आम्ही विचार केला की जर रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनर हप्त्यांवर विकत घेता येतात तर आंबा का नाही. राज्यातील कोकण विभागातील देवगड आणि रत्नागिरी येथील अल्फोन्सो अर्थात 'हापूस' आंबा किरकोळ बाजारात सध्या १०० ते १३०० रुपये प्रति डझन दराने विकला जात आहे.


सणस यांनी दावा केला की, त्यांचा हा ईएमआयवर आंबे विकणारा देशातील पहिला दुकान आहे. सणस यांच्या आउटलेटवरून ईएमआयवर फळे खरेदी करण्याची प्रक्रिया मोबाईल फोन खरेदी करण्यासारखीच आहे. ग्राहकाला क्रेडिट कार्ड वापरणे आवश्यक आहे आणि खरेदीची रक्कम तीन, सहा किंवा १२ महिन्यांच्या ईएमआयमध्ये रूपांतरित केली जाते. ही योजना ५,००० रुपयांच्या किमान खरेदीसाठी उपलब्ध असल्याचे सणस यांनी सांगितले.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी