Bharat Scouts and Guides: ‘भारत स्काउट्स अँड गाईड्स’ या संघटनेच्या 13 व्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. मुंबईतील वर्षा निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात त्यांनी पदभार स्वीकारला. सध्या संघटनेची सदस्यसंख्या 80 लाखांहून अधिक असून, ती 5 कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार फडणवीस यांनी व्यक्त केला.
Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसच्या जेवणात आढळला लोखंडी बोल्ट; प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल, IRCTCकडून माफी
Vande Bharat Express: वंदे भारत एक्सप्रेसमधील जेवणाच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रार समोर आली आहे. बंगळूरुहून बेळगावीला प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला जेवणात ...
सेवा आणि शिस्तीतून तरुणांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यावर भर
पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सेवा आणि शिस्तीतून व्यक्तीचे चारित्र्य घडते. तरुण पिढीमध्ये सेवा, शिस्त आणि देशाप्रती समर्पणाची भावना निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम भारत स्काउट्स अँड गाईड्स करते. देशाचे भविष्य घडवण्यात या संघटनेची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न मांडले आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलांवर योग्य वयात चांगले संस्कार होणे आवश्यक आहे. सेवा, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव असलेली तरुण पिढी घडवण्यासाठी संघटनेचा पाया अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे फडणवीस म्हणाले. (Bharat Scouts and Guides)
ग्रामीण विद्यार्थ्यांनाही समान संधी देण्याचे उद्दिष्ट
कार्यक्रमात संघटनेच्या उपाध्यक्षा प्रतिभा पांड्या यांनी नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. गेल्या 76 वर्षांपासून शिक्षक, स्वयंसेवक आणि पालकांच्या योगदानातून ही चळवळ उभी राहिली असून, सध्या संघटनेची सदस्यसंख्या 80 लाखांपेक्षा अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.
संघटनेचा विस्तार करताना ‘पोहोच, गुणवत्ता आणि अभिमान’ या त्रिसूत्रीवर भर दिला जाणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शहरी विद्यार्थ्यांप्रमाणे संधी उपलब्ध करून देणे, प्रथमोपचार, आपत्ती व्यवस्थापन आणि नेतृत्वगुणांचे प्रशिक्षण देणे ही प्रमुख उद्दिष्टे असतील. स्वयंसेवकांच्या अडचणी सोडवण्यालाही प्राधान्य दिले जाईल, असे पांड्या यांनी स्पष्ट केले. (National President)
अध्यक्षीय सनद आणि स्काउट स्कार्फ प्रदान
या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांना 13 वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल अध्यक्षीय सनद आणि स्काउट स्कार्फ प्रदान करण्यात आला. यावेळी संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह विविध मान्यवर आणि सदस्य उपस्थित होते.