आता शिर्डीतील लूटमार थांबणार!

साईभक्तांसाठी संस्थानने घेतला मोठा निर्णय


शिर्डी : शिर्डी येथील साईबाबा मंदिरात जगभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. दरदिवशी मोठ्या संख्येने भाविक शिर्डी येथे साईचरणी लीन होतात. या साईभक्तांना साई मंदिरात जाताना आता हार, फुल, प्रसाद नेता येणार आहे. तसेच याठिकाणी होणारी भक्तांची लूटमार थांबवण्यासाठी साई संस्थानमार्फत भाविकांना रास्त दरात हार-फुलांची विक्री केली जाणार आहे.


साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने ठराव करत साई मंदिरात भाविकांना हार फुल प्रसाद घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच साई संस्थानमार्फत भाविकांना रास्त दरात फुलांची विक्री केली जाणार आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांकडून खरेदी करून मंदिराच्या प्रांगणात भाविकांना फुले उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. त्यामुळे साई भक्तांची लूट थांबवून आता शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार आहे.


दरवर्षी शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी कोट्यावधी भाविक येत असतात. दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या श्रद्धेचा आणि भावनांचा आधार घेत व्यावसायिक तसेच विक्रेते हार, फुले आणि प्रसाद अशा पुजा साहित्याच्या माध्यमातून त्यांना आर्थिक लुबाडतात. दोनशे रुपयांची फुल माळा दीड ते दोन हजार रुपयांना विकून भाविकांची लूट करतात. अशा अनेक तक्रारी साई संस्थानकडे आल्या होत्या.


याची गंभीर दखल घेत आता साई संस्थानमार्फत भाविकांना रास्त दरात फुलांची विक्री केली जाणार असल्याने भाविकांची होणारी लूट आता थांबणार आहे. या निर्णयाचे साईभक्तांमधून स्वागत केले जात आहे.

Comments
Add Comment

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने