आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून ३७ जणांची ३५ लाखांची फसवणूक

डोंबिवली (प्रतिनिधी): आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून भामट्या टोळीने ऑनलाइन गुंतवणूक माध्यमातून डोंबिवली आणि परिसरातील ३७ जणांची एकूण ३५ लाख रुपयांची वर्षभराच्या कालावधीत फसवणूक केली. या गुंतवणूकदारांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.


या ३७ जणांच्या २० हजारापासून ते ४ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणूक रकमा आहेत. याबाबत एका महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याने गु्न्हा दाखल केला आहे. ही महिला एका औषध कंपनीत विदारक व्यवस्थापक आहे. या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेने गेल्या महिन्यात त्यांच्या व्हॉट्सअॅपवर द रोड रिचेस-तेरा नावाने एक गुंतवणूक योजनेचा माहिती देणारा मेसेज आला. २५ हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास ग्राहकाला ५० टक्के नफा आणि कंपनीला ३० टक्के सूट परतावा मिळेल, असे या महिलेला भुरट्यांनी सांगितले. सुरुवातीला तसा परतावा या महिलेला देण्यात आला. त्यानंतर जाळ्यात ओढल्यावर भामट्यांनी या महिलेची फसवणूक केली़ अशाच पध्दतीने इतर ३६ गुंतवणूकदारांकडून गेल्या वर्षभराच्या कालावधीत या भुरट्यांनी २९ लाख रुपयांची रक्कम गुंतवणुकीच्या नावाखाली वसूल केली.

Comments
Add Comment

Shrikant Shinde on Purnekar Case: पूर्णेकर हत्या प्रकरणावरून श्रीकांत शिंदेंनी शिवसेनेच्या प्रवक्त्यांचे कान टोचले; नंदनवन बंगल्यावर बैठक

मुंबई : ठाण्यातील उबाठा गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले

Mumbai BEST Bus Update : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! बेस्टच्या ताफ्यात ४४ नव्या एसी इलेक्ट्रिक बसेस दाखल; शहरात ५ नव्या मार्गांवर धावणार

मुंबई : मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर करण्यासाठी बृहन्मुंबई विद्युत

लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या अजरामर सुरांना उजाळा; ‘मृदगंध पुरस्कारां’चे 26 नोव्हेंबरला वितरण

काही आवाज काळाच्या पडद्याआड जात नाहीत, तर ते पिढ्यान्‌पिढ्या मनामनांत घुमत राहतात. लोकशाहीर विठ्ठल उमप हे असेच

ठाणे शहर भाजपच्यावतीने आयोजित ‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’ आंदोलनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काँग्रेस-इंडिया आघाडीवर घणाघात

ठाणे : ‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’च्या नावाखाली काँग्रेस, इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीकडून पंतप्रधान

Bhiwandi Municipal Corporation: भिवंडी महापालिका कर्मचार्‍यांची दिवाळी गोड, महापौरांकडून सानुग्रह अनुदान जाहीर

ठाणे: भिवंडी महापालिका कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड जाणार आहे. महानगर पालिकेने आपल्या कर्चमाऱ्यांना

Thane Water Shortage: ठाण्यात पाणीटंचाईचा फटका, वाहन धुणाऱ्या सर्व्हिस सेंटर्सवर बंदी

ठाणे: एल निनोच्या परिणामामुळे निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईची चिंता लक्षात घेता, ठाणे महानगर पालिकेने महत्त्वाचा