दीपक हुडा फलंदाजीसाठी आला, तेव्हाच लखनऊने सामना गमावला

विरेंद्र सेहवागचे मत


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लखनऊने दहा षटकांनंतर एक गडी गमावून १०२ धावा केल्या होत्या. या धावसंख्येनंतर त्यांनी सामना एवढ्या मोठ्या फरकाने गमावला नसता. पहिला गडी तंबूत परतल्यानंतर त्यांनी फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजाला पाठवायला हवे होते. दीपक हुडा फलंदाजीसाठी आला तेव्हाच लखनऊने सामना गमावला, असे मत भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागने व्यक्त केले. गुजरातविरुद्ध रविवारी झालेल्या लखनऊच्या पराभवानंतर सेहवागने आपले मत व्यक्त केले. एका क्रिडा वाहिनीशी सेहवाग बोलत होता.


सेहवाग म्हणाला की, पहिली विकेट पडल्यानंतर निकोलस पूरन, मार्कस स्टॉयनिस, स्वतः कर्णधार कृणाल पंड्या किंवा चेन्नईविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात वेगवान धावा करणारा आयुष बडोनी यांच्यापैकी एखादा फलंदाज खेळू शकला असता. पण दीपक हुडा फलंदाजीला आला. जो सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे." दीपक हुडा फलंदाजीसाठी आला तेव्हाच लखनऊने सामना गमावला असे सेहवाग म्हणाला.


२२८ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊने अप्रतिम सुरूवात केली होती. क्विंटन डिकॉक (७०) आणि कायल मेयर्स (४८) यांनी सामन्यात चुरस आणली होती. नवव्या षटकात कायल मेयर्स बाद झाल्यानंतर दीपक हुडा खेळपट्टीवर आला. यानंतर लखनऊची धावगती मंदावली आणि संघावर दबाव वाढत गेला. हुडा सध्या फॉर्ममध्ये दिसत नाही. पहिल्या ९ सामन्यांत त्याने केवळ ५३ धावा केल्या. त्याचबरोबर निकोलस पूरन आणि आयुष बडोनी हे चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. पण लखनऊच्या व्यवस्थापनाने दीपक हुडावर विश्वास दाखवला. याचाच दाखला देत विरेंद्र सेहवागने लखनऊच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केला.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून