BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून विरंगुळ्यासाठी किंवा ऑनलाईन गेमिंगच्या स्पर्धांमध्ये तरुण वयोगटातील मुले हा खेळ खेळताना हमखास आढळतात. तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या या खेळासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. Krafton India या गेम बनवणाऱ्या कंपनीने BGMI Lite या खेळाचं नाव बदलून आता BGMI Air असे ठेवले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, भारतात या खेळासाठी एक करोडहून जास्त लोकांनी पूर्व नोंदणी केली आहे. या खेळाची डाउनलोड साईझ 1GB असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.


जर तुमच्या मोबाईलमध्ये BGMI खेळताना स्टोरेजची कमतरता भासत असेल, मोबाईल हँग होत असेल किंवा मोबाईल लवकर गरम होत असेल तर नवीन BGMI Air यावरील उपाय आहे. Krafton India कंपनीने १५ ऑक्टोबर २०२६ रोजी BGMI Air ची घोषणा केली. याचे आधीचे नाव BGMI Lite होते. कंपनीचा उद्देश BGMI या खेळाला जास्तीत जास्त मोबाईल वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवणं हा आहे. कमी स्टोरेजच्या मोबाईलमध्ये देखील खेळण्यास सोपा असेल या उद्देशाने हे BGMI चे व्हर्जन तयार करण्यात आले आहे. तूर्तास कंपनीने या गेमच्या लाँचची तारीख स्पष्ट केलेली नाही.



Krafton कंपनीने या खेळाला आधी BGMI lite असे नाव दिले होते. आता नाव बदलून BGMI Air असे केले आहे. याचं मुख्य उद्देश हेच आहे की कमी डाउनलोड साईजमध्ये देखील गेमर्सना खेळाचा चांगला अनुभव मिळावा. खेळाचं नाव बदललं म्हणजे सगळे फीचर्ससुद्धा बदलले असा अर्थ होत नाही. याची सुरुवातीची डाऊनलोडिंगची साईज ही १GB असणार आहे ज्यामुळे वापरकर्त्यांचे स्टोरेज वाचेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, २०२६ च्या शेवटपर्यंत हा गेम भारतात येऊ शकतो.


BGMI Air ची पूर्वनोंदणी


या खेळाची पूर्व नोंदणी ही २५ ऑगस्ट २०२६ पासून सुरु झाली आहे. Krafton India ने सांगितलं आहे की, लवकरच गेमसाठी ओपन बीटा सुरु करण्यात येईल. लाँच होईपर्यंत यासंदर्भातील अधिकृत माहिती BGMI Air च्या इंस्टाग्राम पेज आणि त्यांच्या इतर माध्यमांद्वारे गेमबद्दल नियमित अपडेट्स आणि अधिक तपशील शेअर करतील.


पूर्वनोंदणी कशी करावी?


भारतातील अँड्रॉइड वापरकर्ते गुगल प्ले स्टोअरद्वारे BGMI Air साठी साइन अप करू शकतात.

  • तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनवर गुगल प्ले स्टोअर उघडा.

  • BGMI Air शोधा.

  • त्यानंतर गेमचा मेनू उघडा.

  • प्री रजिस्टर बटणावर टॅप करा.

  • प्री रजिस्टर केल्यानंतर ऑटो इन्स्टॉल पर्याय सक्षम करून गेम लाँच झाल्यावर तो त्यांच्या डिव्हाइसवर आपोआप इन्स्टॉल करण्याचा पर्याय देखील निवडू शकतात.

Comments
Add Comment

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन

IND vs WI: हैदराबाद टी20 पराभवातून टीम इंडियाने घेतला धडा, पुढचा सामना कसा जिंकणार ते श्रेयस अय्यरने सांगितलं

भारतीय संघाला टी20 मालिकेतील वेस्ट इंडिजविरुद्धचा पेपर थोडा कठीण गेला आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात सामना पराभवाचा वेग काही भलताच, आतापर्यंत सर्व भारतीय कर्णधारांना टाकलं मागे

[caption id="attachment_1066530" align="aligncenter" width="800"] वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि मालिका विजयाचं गणित

IND vs WI: वेस्ट इंडिजने चौथ्या सामन्यात डाव साधला, भारताला नमवून मालिकेत 2-2 ने बरोबरी

वेस्ट इंडिजने चौथ्या टी20 सामन्यात भारताला नमवून मालिका विजयाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. या मालिकेत चौथ्या

IND vs WI: शाई होपने भारतीय गोलंदाजांना धुतलं, शतक ठोकत टीम इंडियाला बॅकफूटला ढकललं

भारत वेस्ट इंडिज मालिकेतील चौथा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सुरू आहे. या