हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला फलंदाजीदरम्यान दुखापत झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शमार जोसेफच्या घातक बाऊन्सरमुळे अर्शदीपच्या खांद्याला दुखापत झाली. या घटनेनंतर भारताचे दिग्गज क्रिकेटपटू आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी जोसेफच्या गोलंदाजीच्या रणनीतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आधीच फलंदाजीत अडचणीत असलेल्या खेळाडूला लक्ष्य केल्याबद्दल गावस्कर यांनी लाइव्ह सामन्यादरम्यान संताप व्यक्त करत गोलंदाजाच्या खेळमनावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
सामन्यातील घडामोडी आणि अर्शदीपची माघार
भारताच्या डावातील अखेरच्या षटकात अर्शदीप सिंग फलंदाजी करत असताना शमार जोसेफने टाकलेला तीव्र बाऊन्सर थेट त्याच्या खांद्यावर आदळला. तीव्र वेदना होत असतानाही अर्शदीपने जिद्दीने फलंदाजी सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याची बिकट अवस्था पाहून कर्णधार श्रेयस अय्यरने त्याला तातडीने मैदान सोडण्याचा सल्ला दिला. यानंतर अर्शदीपने स्टम्प्सपासून दूर होत शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण जोसेफने पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू टाकत त्याला त्रासदायक ठरवण्याची रणनिती कायम ठेवली. अखेर अर्शदीपला पाच धावांवर 'रिटायर्ड हर्ट' होऊन मैदान सोडावे लागले.
सुनील गावस्कर यांचा संतप्त सवाल
समालोचन करताना सुनील गावस्कर यांनी शमार जोसेफच्या या धोरणावर कडाडून टीका केली. फलंदाज आधीच बचावात्मक भूमिकेत असताना आणि स्टम्प्स समोर असताना त्याच्या शरीराला लक्ष्य करणे योग्य नाही, असा सूर त्यांनी आवळला. “तो फलंदाजालाच लक्ष्य करत आहे. स्टम्प्स समोर असताना फलंदाजावर हल्ला कशाला?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. फलंदाज क्रीजवरून दूर सरकत असताना गोलंदाजाने थेट स्टम्प्सवर चेंडू टाकून विकेट मिळवणे अधिक योग्य ठरले असते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214 धावांच्या मोठ्या पराभवाचा सामना करावा ...
सामन्याचा निकाल आणि मालिकेतील रंगत
या चुरशीच्या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित षटकात 3 बाद 247 अशी विशाल धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव 223 धावांवर संपुष्टात आला. वेस्ट इंडिजने हा सामना 24 धावांनी आपल्या नावावर केला. या विजयासह वेस्ट इंडिजने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधत मालिका अत्यंत रोमांचक वळणावर आणून ठेवल्याचे पाहायला मिळाले.