भाजपनं केला निकाल मान्य; बहुमत मिळालं नाही तरी भाजप हार मानणार नाही असा दावा
May 13, 2023 01:35 PM
निकालाचे विश्लेषण करू अन् लोकसभेत कमबॅक करू - बोम्मई
बंगळुरू : गेले अनेक दिवस सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. आतापर्यंत १३४ जागा मिळवत काँग्रेस आघाडीवर आहे. भाजपने आतापर्यंत ६४ तर जेडीएसने २२ जागांवर विजय मिळवला आहे.
दक्षिण बेळगावचा निकाल जाहीर झाला असून येथे भाजपचे अभय पाटील विजयी झाले आहेत. बेळगाव उत्तर भागात मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीअखेर भाजपचे रवी पाटील आघाडीवर होते. बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र, भाजपचे बी. वाय विजयेंद्र 'शिकारीपुरा' विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत.
"कर्नाटक निवडणुकीत पंतप्रधानापासून भाजपा कार्यकत्यांपर्यंत सर्वांनी मेहनत घेतली. आम्हाला बहुमत मिळाले नाही. अंतिम निकाल आल्यानंतर आम्ही त्याचे विश्लेषण करू आणि पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत कमबॅक करू", असा विश्वास कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केला.