नविन संसद भवन उद्घाटनाचा वाद पोहचला सर्वोच्च न्यायालयात

नवी दिल्ली : नवी दिल्ली येथे उभारण्यात आलेल्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करणार आहेत. परंतु या निर्णयाला विविध स्तरावरुन चांगलाच विरोध होत आहे. याविरोधात आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.


नव्या संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे, यासाठी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. या याचिकेमध्ये राष्ट्रपती या देशाचे प्रथम नागरिक असून संविधानाच्या अनुच्छेद 79 नुसार संसद भवनाचा महत्त्वाचा भाग आहेत, असं नमूद करण्यात आलं आहे. तसेच लोकसभा सचिवालयाने घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचं देखील या याचिकेमध्ये म्हटलं आहे.


आर. जयासुकिन यांनी ही जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यांनी त्यांच्या या याचिकेमध्ये म्हटलं आहे की, "देशाच्या संविधानाचे प्रमुख म्हणून राष्ट्रपती पंतप्रधानांची निवड करतात. तसेच अनेक महत्त्वाचे निर्णय राष्ट्रपतींच्या नावाने घेतले जातात. तसेच संसदेमधील सगळी विधेयकं ही राष्ट्रपतींच्या मंजुरीनेच कायदेशीर केली जातात. त्यामुळे राष्ट्रपतींच्या हस्ते या नव्या संसद भवनाचं उद्घाटन करण्यात यावं."

Comments
Add Comment

Flight Emergency Landing : बँकॉकहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे लखनऊत मेडिकल इमर्जन्सी लँडिंग; प्रवाशाची प्रकृती बिघडल्याने धावपळ

लखनऊ :

Cough Syrup Warning : लहान मुलांना खोकल्याचं सिरप देण्याआधी हे नक्की वाचा! ४ वर्षांखालील मुलांसाठी येणार बाटलीवरच मोठा इशारा

मुंबई : लहान मुलांना खोकल्याची औषधं देण्याबाबत केंद्र सरकारकडून अधिक खबरदारी घेतली जात आहे. चार वर्षांखालील

Raipur Coin Wale Ganesh Ji : रायपूरमध्ये ५० हजारांहून अधिक नाण्यांनी सजवलेली गणेशमूर्ती; ‘कॉइन वाले गणेश जी’ची सर्वत्र चर्चा!

Raipur : गणेशोत्सव म्हटलं की बाप्पाच्या आकर्षक मूर्ती, सुंदर सजावट आणि भक्तांचा उत्साह पाहायला मिळतो. यंदा

Neurosurgeon Accident in Telangana : डुलकी लागली अन् नियंत्रण सुटलं? वोल्वो कार डिव्हायडरला धडकून पेटली; कुटुंबीयांना भेटायला निघालेल्या न्यूरोसर्जनचा जळून मृत्यू

तेलंगणा : तेलंगणातील सूर्यापेट जिल्ह्यात रविवारी सकाळी भीषण कार अपघात झाला. खम्ममहून हैदराबादच्या दिशेने

Jharkhand Naxal Leader : वाराणसीत पोलिसांसोबत चकमक; 25 लाखांचा इनामी झारखंडचा नक्षलवादी कमांडर ठार

वाराणसी : वाराणसीमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत झारखंडमधील बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनेचा

PM Surya Ghar Yojana : घरावर सोलर पॅनेल बसवायचा विचार आहे? सरकार देतंय तब्बल ₹७८ हजारांपर्यंत सबसिडी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

मुंबई : वाढत्या वीजबिलातून दिलासा मिळवण्यासोबतच घरगुती पातळीवर सौरऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून