तेलंगणा : तेलंगणातील सूर्यापेट जिल्ह्यात रविवारी सकाळी भीषण कार अपघात झाला. खम्ममहून हैदराबादच्या दिशेने जाणारी वोल्वो कार अचानक डिव्हायडरला धडकली. धडकेनंतर कारने पेट घेतला आणि या आगीत कारमधील न्यूरोसर्जनचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना पिल्लालमारीजवळील खम्मम-हैदराबाद महामार्गावर सकाळी सुमारे ७.१५ वाजता घडली. (Neurosurgeon Accident in Telangana)
कार डिव्हायडरला धडकली अन् पेटली
मिळालेल्या माहितीनुसार, न्यूरोसर्जन कसाकुर्ती जगदीश हे आपल्या वोल्वो कारमधून खम्ममहून हैदराबादला जात होते. कुटुंबीयांना भेटण्यासाठी ते प्रवास करत असल्याची माहिती आहे.
प्रवासादरम्यान अचानक कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार रस्त्याच्या डिव्हायडरला जाऊन धडकली. धडकेनंतर कारमध्ये आग लागली. काही क्षणांतच आगीने संपूर्ण कारला वेढलं आणि कार पूर्णपणे जळून खाक झाली. या दुर्घटनेत जगदीश यांचा मृत्यू झाला. (Neurosurgeon Accident in Telangana)
मुंबई : पत्नीला आपण व्यवसायाच्या कामासाठी परदेशात जात असल्याचं सांगून प्रत्यक्षात महिला मैत्रिणीसोबत मलेशियाला जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या ...
रजिस्ट्रेशन नंबरवरून ओळख पटली
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कारला लागलेली आग विझवली आणि पुढील तपास सुरू केला.
कारच्या रजिस्ट्रेशन क्रमांकाच्या आधारे मृत व्यक्तीची ओळख पटवण्यात आली. कसाकुर्ती जगदीश हे खम्मम येथील ममता हॉस्पिटलशी संबंधित न्यूरोसर्जन होते. (Neurosurgeon Accident in Telangana)
चालकाला डुलकी लागली असावी?
अपघाताच्या प्राथमिक तपासात कार चालवताना चालकाला डुलकी लागली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे कारवरील नियंत्रण सुटून ती डिव्हायडरला धडकली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मात्र, अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कारचा वेग किती होता, नियंत्रण नेमकं कशामुळे सुटलं आणि कारला आग कशी लागली, याचा तपास पोलीस करत आहेत. (Neurosurgeon Accident in Telangana)
मॉस्को : युक्रेनने रशियावर १,००० हून अधिक ड्रोनच्या मदतीने भीषण हल्ला केला आहे. रशियात संसदीय निवडणुकीचा तिसरा आणि अंतिम दिवस सुरू असतानाच हा हल्ला ...
फॉरेन्सिक पथकाकडून तपास
या घटनेनंतर फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी पाहणी केली. जळालेल्या कारमधून काही नमुने गोळा करण्यात आले असून ते तपासासाठी सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.
या नमुन्यांच्या तपासातून अपघाताबाबत आणखी माहिती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांचा तपास आणि फॉरेन्सिक अहवाल समोर आल्यानंतरच या भीषण दुर्घटनेचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. (Neurosurgeon Accident in Telangana)